Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० जून, २०१९

अजितदादा, मला सगळं उघडं करायला लावू नका!मी तुमच्याकडे होतो, त्यामुळे मला सगळं माहिती आहे





पुणे प्रतिनिधी :  राज्याचे 'रोहयो'मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टिकाटिप्पण्णी केल्यावर त्याला क्षीरसागर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना

अजित पवार यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून टोलेबाजी केली. शिवसेनेने ज्यांना मंत्री केले आहे, त्यांनी शिवसैनिक म्हणून काही काम तरी केलेय कां, असा सवाल करत

क्षीरसागरांच्या मंत्रीपदाबाबत टिप्पण्णी केली. त्यावर बोलताना क्षीरसागर यांनी अजित पवारांवर जोरदार पलटवार केला.

क्षीरसागर म्हणाले, ''माझ्या मंत्रीपदाचे क्रेडिट अजितदादा तुम्हालाच आहे. तुम्हीच मला रेटत रेटत इतपर्यंत आणले आहे.

माझा श्वास कोंडला होता. आता तो मुक्त झाला आहे. तुमच्याकडे असे लोकांना मंत्री केले नाही कां? तुमचे सरकार असताना पक्षांतरे झाली आहेत. मी तुमच्याकडे होतो, त्यामुळे मला सगळं माहिती आहे. ते उघड करायला लावू नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध