भाजपचे अध्यक्षपद लवकर सोडण्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाठाम असून, महाराष्ट्र, हरयाणा व झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत त्या पदी राहण्याचा प्रस्ताव त्यांनी अमान्य केला असल्याचे कळते. पंतप्रधाननरेंद्र मोदीयांनी माझ्याकडे सोपविलेली गृह खात्याची जबाबदारी पार पाडण्याकडे मला लक्ष द्यायचे असल्याने अध्यक्षपदअन्य व्यक्तीकडे देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.नव्या अध्यक्षाबाबत चर्चा सुरू झाली असून, त्यात माजी आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे नाव आघाडीवर आहे. मनोहर पर्रीकर यांनी २०१७ साली संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यात जाण्याचे ठरविले, तेव्हा शहा यांना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार झाला. तेव्हाही नड्डा यांचे नाव पक्षाध्यक्षपदासाठी पुढे आले होते. पण त्यावेळी तसे घडले नसले तरी आता मात्र पक्षाचा अध्यक्ष यापदावर जे. पी. नड्डा यांच्याबाबत एकमत होईल, असे समजते. उत्तर प्रदेशातील ८० पैकी ६२ जागा जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते रा. स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक असून, अभाविपमध्येही ते सक्रिय होते.अमित शहायांनी महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत पक्षाध्यक्षपदी राहावे, अशी पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झाले असले तरी प्रत्यक्ष शहा यांची त्यासाठी तयारी नाही. तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात, असे त्यांचे म्हणणे असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.अध्यक्षपदाबाबत पक्षात कसलीही अस्वस्थता वा अस्थिरता राहू नये, असे त्यांनी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल व महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील लोकसभा निवडणुकांमध्ये विजयाचा मोठा वाटा असलेल्या एका नेत्याला सांगितल्याचे समजते. भाजपमध्ये जे. पी. नड्डा यांच्याखेरीज अन्य नावही नाही. पक्षाचे सरचिटणीस व राज्यसभा सदस्य भूपेंद्र यादव यांचे नाव चर्चिले गेले असले आणि पक्षनेतृत्वावर प्रभाव टाकण्यात ते यशस्वी ठरले असले तरी एवढ्या मोठ्या व महत्त्वाच्या पदासाठी त्यांचा आता विचार होणे अवघड दिसत आहे.
गुजरातमध्ये हाय अलर्ट; ‘वायू’ चक्रीवादळाचा धोका.
_____________________________________
‘वायू’ चक्रीवादळ 13 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली.या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश शहा यांनी दिले. तसेच यादरम्यान वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, शाह यांनी आपात्कालिन नियंत्रण कक्षाला 24 तास अलर्ट राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच एनडीआरएफच्या 26 टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी 10 टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दलालाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. तसचे टेहळणी विमान आणि हेलिकॉप्टर्समधूनही परिस्थितीची पाहणी सुरू आहे. या चक्रीवादळाचा फटका गुजरातसोबतच महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने गृहमंत्रालयाने अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हवामान खात्याने सौराष्ट्र आणि किनारपट्टीजवळील भागांमध्ये 14 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची तसेच 110 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे सुटण्याची सुचना जारी केली आहे. या वायू चक्रीवादळाचा मान्सूनवरही प्रभाव पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेआहे.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीदेखील आपात्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रूपाणी यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. तसेच ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवू शकतो अशा 10 जिल्ह्यांमध्ये 13 आणि14 जून रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याची घोषणा केली. दरम्यान, आपण ओदिशा सरकारशीही संपर्कात असून फॅनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी त्यांनी कोणत्या उपाययोजना केल्या होत्या याची माहिती घेत असल्याचेही सांगितले.
चमकी बुखार’मुळे बिहारमध्ये ५६ मुलांचा मृत्यू
____________________________________
‘चमकी बुखार’ या नावाच्या तापामुळे बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात सोमवारपर्यंत २५ मुलांचा मृत्यू झाला. उत्तर बिहारमध्ये या आजाराने ५६ मुलांचा बळी घेतला.या तापामुळे आजारी असलेली १०० मुले मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. या तापाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन तिसरा कक्ष उघडण्याच्या प्रयत्नात आहे. या तापामुळे पीडित असलेली मुले ४ ते १५ वयोगटातील आहे. या तापाचा प्रकोप उत्तर बिहारमधील सीतामढी, शिवहर, मोतिहारी व वैशाली जिल्ह्यांत अधिक आहे. एईएस (एक्टूड इंसेफेलाइटिस सिंड्रोम) आणि जेई (जपानी इंसेफलाइटिस) असे नाव असलेल्या तापास बिहार मध्ये ‘चमकी बुखार’ म्हणून ओळखतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा