Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जून, २०१९

.श्री संदीप कुमार साळुंखे (उपआयुक्त आयकर विभाग ) यांच्या मार्गदर्शनाने व मारवड विकास मंच, ता.अमळनेर यांच्या सहकार्याने,







दहिवद जिल्हा परिषद शाळेतील गरीब मुलांना डिजिटल शाळा या उपक्रमासाठी मिळाला LCD TV व सोबत ` १ ते ४ थी वर्गाचा अभ्यासक्रम .
मित्रानो हा LCD TV कसा आणला व तो आणत असतांना गावातील फाजील पुठा-यानी कसा विरोध केला त्याबाबत ...
माझे प्रिय मित्र ,
संदीप दादा यांना मी फोन केला . दादा आमच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी आपल्या मार्फत LCD TV व सोबत १ ते ४ थी वर्गाचा अभ्यासक्रम मिळाला तर आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीच्या शैक्षणिक विकासात भर पडेल . दादानी लगेच मला सांगितले की , मारवड येथील देवेंद्र सर यांना भेटून प्रस्ताव पाठवा पुठे काय करायचे ते मी पाहतो.
त्यानुसार मी सरांना फोन केला व सरानी मला जिल्हा परिषद शाळेचे लेटर हेड आणायला सांगितले . त्यानुसार मी शाळेतील हेड मास्तर ताई यांना फोन लावला व सांगितले की,मला जिल्हा परिषद शाळेसाठी LCD TV व सोबत १ ते ४ थी वर्गाचा अभ्यासक्रम मारवड विकास मंच च्या मदतीने आपल्या शाळेसाठी आणायचा असून, आपण मला लेटर हेड द्यावे . त्यानी लगेच होकार दिला व सकाळी मी घेवुन येईल असे सांगितले .मी सकाळी लेटर हेड घ्यायला गेलो असता प्रथम हेड मास्तर यांनी माझ्या हातात लेटर हेड दिले पण त्यानंतर मला असे सांगण्यात आले की, गावातील पुठारी यांनी ते लेटर हेड मला देवू नये . तो प्रस्ताव आम्ही घेवुन जावू असे मला सांगितले आहे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या . मग मी हेड मास्तर यांना सांगितले की, ताई साहेब गावातील पुठारी इतक्या दिवसापासून झोपलेले होते का ? का त्यांना असे वाटत नव्हते की, गावातील गरीब ग्रामस्थांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मराठी शाळा डिजिटल करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावेत . त्यांच्या मनात असे कोणतेच विचार येणार नाहीत त्यांचे मुले अमळनेरच्या इंग्रजी माध्यम शाळेमध्ये वार्षिक ५० हजार फि भरून आणि गरिबांची मुले वाऱ्यावर हा कुठला न्याय आहे . तुम्हाच्या कडे ते लेटर हेड मागत असतील तर तुम्ही त्यांना जरूर द्या मी चांगल्या कामाला विरोध करणार नाही. पण माझ्या कामांत कुणी आडवा गेलेला मला चालत नाही. ताई साहेबांनी गावातील एका क्लास वन ऑफिसरशी मला बोलायला सांगितले ,मी टपाल्या म्हणून काम करणार आहे त्यामुळे तुम्ही विनाकारण चांगल्या कामांत राजकारण करू नका व मला माझे काम करू द्या . तेव्हा त्यांनी होकार दिला.
तेव्हा मित्रानो व माझ्या प्रिय ग्रामस्थांनो खरच तुमच्या उज्ज्वल भविष्याची चिंता गावातील राजकीय लोकांना आहे का ? खरच ते तुमच्या साठी गावासाठी विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत का ? जर त्यांना खरच तुमच्या विकासाची व गावातील गरीब ग्रामस्थांच्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता असती तर त्यांची मुले इंग्रजी माध्यम मधील शाळेत व तुमची मुले जिल्हा परिषद शाळेत असा फरक राहिला नसता . शाळा डिजिटल राहिली असती तर सर्वच मुले जिल्हा परिषद शाळेत शिकायला गेली असती . गावातील २५ ते ३० मुले ललिता पाटील यांच्या शाळेत जातात म्हणजे प्रत्येकी वार्षिक अंदाजे ५० हजार जरी खर्च धरला तरी १५ लाख रुपये वर्षाला गावाचे खर्च होतात. यांनी ठरवले तर १ महिन्यांत गावाची शाळा डिजिटल होवू शकते .पण त्यांना माहित आहे झेंडे धरायला माणस सापडणार नाहीत .त्यासाठी जे आहे तेच चांगले आहे.
विचार करा मित्रांनो , आई सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत विझवण्याचा प्रयत्न सर्वदूर चालू आहे . आपला देश आपले राष्ट्र शाहू , फुले ,आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून जगणारे आहे .अश्या तुगलक पुठाऱ्यांच्या सोबत राहून तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेण्याचा प्रयत्न सुरु आहे .अजूनही वेळ गेलेली नाही समजा व शिका .
माझा शब्द आहे आपण दहिवद जिल्हा परिषद शाळा डिजिटल करु त्यासाठी मला तुमच्या मदतीची नितांत गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध