Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जून, २०१९

कुरखळी येथे प्रवेशोत्सव साजरा



शिरपुर कुरखळी प्रतिनिधी योगेश्वर मोरे 

जिल्हा परिषद शाळा कुरखळी येथे शाळेच्या प्रारंभ दिनी प्रभात फेरीने नवागत बालकांच्या घरी जाऊन त्यांचे स्वागत सत्कार करून त्यांना आनंदाने उत्साहाने वाजत गाजत शाळेत आणण्यात आले. त्यानंतर समारंभपूर्वक कार्यक्रमाद्वारे सर्व विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते मोफत 



पाठ्यपुस्तक व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मोरे हे होते तर प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सदस्य अवधूत मोरे,लोकनियुक्त सरपंच सिताराम भील,माजी सरपंच पुरूषोत्तम शिरसाठ,माजी उपसरपंच यमुनाबाई भील ,भटाबाई भील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम कोळी,तज्ज्ञ मार्गदर्शक पोपट शिरसाठ,दिपक कोळी,प्रल्हाद कोळी यांच्या सह सर्वश्री शिक्षकवृंद उपस्थित होते.



अवधूत मोरे व पोपट शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध