Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३० जून, २०१९

अमळनेर ..न्यु प्लाट ,शिवाजी उद्यान या मध्यवर्ति ठिकाणी अंधाराचे साम्राज्य...लोकप्रतिनिधी उदासिन तर नगर परिृदेचे अक्षम्य दुर्लक्ष.....

अमळनेर :प्रतिनिधी (संदीप सैदाणे)


अत्यंत वर्दडीचा परिसर असलेला न्यु प्लाट एरीया येथे गेल्या अनेक महिन्यांपासून पथदिवे बंद असून त्या ठिकाणी संध्याकाळी ७ वाजेपासून स्मशान शांतता असते.अधाराचा फायदा घेउन रोडरोमीयोंचा वावर तेथे आढळून येतो.परिसरातील नागरीकांनी अवेकवेळा तक्रार करूनदेखिल न.पा. प्रशासन समस्याचा निपटारा करायला तयार नाही.शीवाजी उद्यानाजवळ वर्षभरापूर्वी बोहरी पेट्रोल पंपाचे  मालकावर गोळीबार करून खून झाल्याची घटना अजून विस्मरणात गेली नसून प्रशासनाचे डोळे मिटलेले आहेत अशा तेथिल नागरीकांच्या प्रतिक्रीया आहेत.अनेक सामाजीक कार्यकर्ते,राजकिय पुढारी,डॉक्टर,वकिलाचे ,व्यवसायीकाचे निवासस्थाने तेथे असून अनेक महिला,पुरूष उद़्यानात इव्हीनींग वॉकला येतात परंतू अंधारामुळे भीतीच्या मानसिकतेमध्ये असतात.पेट्रेाल पंप ते सौरभ एक्वा तसेच सिद्धकला हॉस्पिटल ते देना बँक कॉर्नर पर्यंत एकही पथदिवा चालू स्थितीत नाही याची संबधितंनी नोंद घ्यावी व परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी तेथिल रहीवाशी सुनिल मन्साराम पाटील व इतरांनी केली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध