Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जून, २०१९

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावांना डॉ. जितेंद्र ठाकुर यांची भेट







शिरपूर  तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे  जुने भामपुर, नवे भामपुर गावाजवळील हाय-वे लगतची काठेवाडी वस्ती, भटाणे, अर्थे खु कुवे, येथे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले  जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजपाचे शिरपूर तालुका प्रभारी डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी नुकसान झालेल्या गावांना भेट दिली. जुने भामपुर येथे गावा लगत असलेल्या नाल्याला

 अतिपूर आल्याने नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील संसार उपयोगी वस्तु वाहून गेल्या. शेतकऱ्यांनी खळ्यात बांधलेले 2बैल, 2 म्हशी, १ वासरू आणि काठेवाडी वस्तीतील २५ गाई पाण्याच्या प्रवाहात वाहून मृत्यु पावल्या तसेच खळ्यातील रासायनिक खताच्या गोण्या व गुरांचा चारा वाहून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले दिसून आले. भटाणे व कुवे येथे काही 

घरांवरील पत्रे वादळामुळे उडून गेल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले तसेच अर्थे खु. येथील एका शेतकऱ्याची सागाची झाडे  वाहून गेली. या ढगफुटी सारख्या पावसामुळे महिन्याभरपूर्वी ठिबकद्वारे लागवड करून वाढवलेला कापसाचे रोपे देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याने 

सर्वाधिक नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून डॉ. जितेंद्र ठाकुर यांनी लगेचच तहसीलदार, तालुका कृषी आधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून झालेल्या नुकसाणीचे पंचनामे करण्याचे सांगितले. व शेतकऱ्यांना धीर देत शासनाकडे पाठपुरावा करून नुकसानीचा मोबदला मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या वेळी डॉ. जितेंद्र ठाकुर यांच्या सोबत मोहन पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील, पंचायत समिती सदस्य ब्रिजलाल मोरे, राजेंद्र देवरे,भाजपा सरचीटनीस दीपक ठाकुर यांसह जुने भामपुर, भटाणे, कुवे येथील भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते

शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी पाठपुरावा करणार---डॉ.जितेंद्र ठाकुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध