Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ जून, २०१९

तरूण गर्जना 24TG TOp TEN




०१) पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक, सभागृहाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच.  

०२) यापुढे कोणतीही फाईल थांबणार नाही, कामे थांबावित म्हणून नाही तर कामे व्हावीत म्हणून काम करणार - सांगलीचे नूतन आयुक्त नितीन कापडणीस यांची ग्वाही.

०३) विरोधकांपेक्षा एकनाथ खडसेंची सरकारवर प्रश्नांची सरबत्ती, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कुपोषणाच्या मुद्द्यांवर खडसेंचा फडणवीस सरकारला घरचा आहेर.

०४) महिलेच्या स्वकमाई संपत्तीत मृत्यू पश्चात्य आई-वडिलांनीही समान वाटा मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल - ॲड. मृणाल बुवा.

०५) नागपूरच्या 'सावजी'मध्ये सरकारकडून दारुची परवानगी, एका महिन्यात परवानगीसाठी तब्बल दीडशे अर्ज, ब्रॅण्डवर परिणाम होणार असल्याने अनेकांचा विरोध.

०६) सांगली महापालिकेचे नूतन आयुक्त नितीन कापडणीस यांचे हार-तुऱ्यांनी स्वागत होत असताना मनसेने मात्र नव्या आयुक्तांना भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन केले स्वागत.

०७) विधानभवन कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळमध्ये आढळले चिकनचे तुकडे, परीसरात खळबळ, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर अधिकारी संतप्त.

०८) 13 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर जत दुष्काळी जनतेची पायी दिंडी मुंबईत दाखल, उद्या आझाद मैदानावर तीव्र आदोलन, पाणी दिल्याशिवाय माघार नाही - तुकाराम महाराज.

०९) खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणं विकणाऱ्यांचा सुळसुळाट, नागपूरात करोडो रुपयांचं बोगस बियाणं जप्त.

१०) विश्वचषकात टीम इंडियाला मोठा झटका, दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून बाहेर, रिषभ पंतला संधी.

११) सांगलीत कौटुंबिक वादातून मेहुण्याकडूनच भावजीचा निर्घृण खून, आरोपी फरार.     

१२) कुपवाडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, जुगार खेळणारा पोलीस कर्मचारी पलायन केल्याची चर्चा, मुद्देमालासह चौघांना अटक.

१३) राज्यातील बहुचर्चीत नाणार प्रकल्प स्थलांतरित, ग्रामस्थांचा विरोध नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधानसभेत लेखी उत्तर.

१४) अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात पाणी पातळीत झपाट्याने घट, केवळ 13 टक्के जलसाठा शिल्लक, 2008 नंतर प्रथमच ही परिस्थिती.

१५) मिरजेत विष प्राशन करून आत्महत्या केल्या प्रकरणी माजी नगरसेवक साजिद पठाण व बबलू पठाण या दोघांना पोलिसांनी केली अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी. 

१६) सांगोला तालुक्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले.

१७) जत वळसंग येथील श्री. केंचराया देवस्थानची पारंपरिक पूजा डावलत असलेच्या निषेधार्थ महिलांचा देवस्थान समितीच्या विरोधात आत्मदहनचा इशारा.

१८) बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून लाखो रुपयांचा अपहार  केल्याचा आरोप करत पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन.

१९) वेतनवाढीच्या मागणीसाठी सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आशा व गटप्रवर्तक महिला संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन.

२०) शिवसेना पक्षाच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त जयसिंगपूर येथील नगरपालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप.

२१) सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे हनुमान देवाच्या यात्रेस सुरुवात, महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो भाविक दाखल.

२२) बीडमध्ये खाजगी रुग्णालयात अनेक उसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस, मंत्री एकनाथ शिंदेंच्या कठोर कारवाईच्या सूचना.

२३) परभणी वडगांव ईक्कर येथील शिवारात वाळु माफिया कडुन सरपंचावर हल्ला, ग्रामस्थांची कारवाईची मागणी.

२४) सोलापुरात शालेय विद्यार्थांची अनाधिकृतपणे वाहतूक करणाऱ्या स्कूल गाड्यांवर आरटीओची कारवाई, 20 गाड्या केल्या जप्त.

२५) निराधराचे पैसे जमा न झाल्याने मनोरुग्ण असलेल्या वृद्धाने सोलापुरातील उत्तर तहसीलदार कार्यालयात नग्न होऊन केले आंदोलन.

२६) पनवेल कळंबोली बॉम्ब सदृश्य वस्तू प्रकरण, सीसीटीव्ही फुटेज समोर, हातगाडीवरून बॉक्स आणताना दिसला संशयित.

२७) शिराळा सय्यदवाडी तसेच कुंभवडेवाडी येथे ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई, खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची ग्रामस्थांना नामुष्की.

२८) सांगली महापालिकेचे नूतन आयुक्त म्हणून नितिन कापडणीस यांनी स्वीकारला पदाचा कार्यभार.

२९) शाळेचा पहिलाच दिवस शिक्षकाविना, महाराष्ट्रातील वास्तववादी उदाहरण, कोल्हापूर शाहूवाडीत शिक्षकांची 200 पदे रीक्त.

३०) एसटीने हुलकावणी दिल्याने ट्रक पलटी होऊन एक जण जखमी, लाखोंचे नुकसान.

३१) चंद्रपूर शहरातील MEL प्रकल्पाजवळ 22 लोकांनी केली शेजारच्या घराची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद, 24 जणांविरोधात गुन्हा दाखल.

३२) कुत्र्याच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यु, गोंदियातील येरमडा जैतुरटोला जंगल परिसरातील घटना. 

३३) यवतमाळ बाभूळगाव नागरपंचायतीवर पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा, नगराध्यक्ष, मुख्यअधिकाऱ्यांच्या खुर्चीला ब्रेशमाचे झाड भेट.

३४) संसदीय कार्यपद्धतीमध्ये नोकरशाही हा स्वतंत्र वर्ग आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी निर्भयपणाने काम करावे - ॲड.अमित शिंदे.

३५) शिवीगाळ केली म्हणून आईचा खून करणाऱ्या मुलाला सांगली जिल्हा न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा.

३६) अर्थसंकल्पातील तरतुदींची पूर्तता करत नसल्याच्या विरोधकांचा कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत आरोप.

३७) दारूच्या नशेत घरगुती भांडणातुन केला पत्नीचा खुन, कराड बनवडी येथील घटना, पती स्वतःहून पोलीसांत हजर.

३८) यवतमाळ पांढरकवडा येथील पंचायत समितीच्या नरेगा कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सभापती आंदोलन करण्याचा संतोष बोरेले यांचा इशारा. 

३९) वर्धा जिल्ह्यात नागरिकांना वाढीव विद्युत बिल, महावितरणने लावलेले मीटर खराब असल्याचा आरोप, युवा परिवर्तन की आवाज संघटना करणार घेराव.

४०) बीडच्या एका उपविभागीय अधिकाऱ्यासह दोन तहसीलदारांच्या निलंबनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आयुक्तांकडे प्रस्ताव.

४१) कुपवाडमध्ये मध्यस्थी करून भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर चाकू हल्ला.

४२) तासगाव पोलिसांच्या चौकशीच्या मागणीसाठी अन्यायग्रस्त कुटुंबाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

४३) कुपवाड मधील उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलींचे अज्ञाताकडून अपहरण.

४४) वस्त्रनगरी इचलकरंजीत शत्तकोत्तर परंपरा असलेला कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा.

४५) कोल्हापूर महापालिकेच्या महासभेत महापौर सरिता मोरे यांनी दिला राजीनामा.

४६) इचलकरंजी शहरामध्ये बैलांच्या मिरवणूकीदरम्यान बैलाची वृद्ध महिलेला धडक, महिला गंभीर जखमी.

४७) जनतेला वेळेत दाखले द्या, तक्रार खपवून घेणार नाही: सांगलीच्या महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी जन्ममृत्यू विभागाला घेतले फैलावर.

४८) सांगलीत कौटुंबिक वादातून मेहुण्याकडूनच भावजीचा निर्घृण खून, आरोपी फरार.

४९) सांगली डी मार्ट 100 फुटी रोड  येथून हद्दपार केलेल्या आरोपीस विश्रामबाग पोलिसांकडून अटक.

५०) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडला राज्यस्तरीय कार्यक्रम, कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह बाबा रामदेव राहणार उपस्थित.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध