Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ जून, २०१९

सोलापुर जिल्हा भोई समाज सेवा संघ.सोलापुर



सन्मान समाजातील होतकरू गुणवंत विध्यार्थ्यांचा

दहावी, बारावी पास,नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करियर मार्गदर्शन कार्यक्रम भोईराज भवन येथे आयोजीत करण्यात आले होते सदर कार्यक्रमावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मा श्री गोकुळजी मवारे साहेब माजी जिल्हाधिकारी, मा श्री शरदजी आंगणे साहेब कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग उपसंचालक पुणे, मा श्री नगरसेवक अमरजी पुदाले, मा श्री कुंभारराजे साहेब, साह्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग, सौ संगीता भतगुणकी, मा श्री दिलीप भाऊ सिद्धे, सौ योगेश्वरी मवारे आदिंची प्रमुख उपस्थितीती होती तर सदर कार्यक्रमावेळी करियर मार्गदर्शन करताना संगीता भतगुणकी यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून ध्येयाच्या ध्यास धरावा यश नक्किच मिळेल असे वक्तव्य केले तर अध्यक्षिय मनोगतामध्ये मा श्री शरदजी आंगणे साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना अथक परिश्रम घेवुन आपले शिक्षण पूर्ण करावे व आपले यश साध्य करावे असे मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमावेळी सुत्रसंचालन मयुर गवते यांनी केले तर आभार प्रदर्शन कांचन सिद्धे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपकजी निर्मळ,कल्पक पुदाले, अनिल भुजंगे, संतोष बिबटे, गुंडु निर्मळ, पप्पु जिरंगे, माधुरी जंबुरे ,आदिंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले तर कार्यक्रमावेळी समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध