Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २४ जून, २०१९

भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे जळगावला मेळावा घेणार -पुरुषोत्तम काळे


जळगाव-भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे समाजात जाणीव जागृती करून विविध योजनांची माहिती देण्याचा उद्देशाने व प्रलंबित प्रश्न मेळाव्यास उपस्तीत लोकप्रतिनिधीसमोर मांडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मा धनंजय ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध जिल्ह्यात जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात येणार असून नाशिक विभागातील जळगाव व नंदुरबार येथे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असून या मेळावाच्या माध्यमातून भटक्या विमुक्तच्या 53 जातीच्या लोकांच्या विविध प्रलंबित प्रश्न व समस्या शासनापर्यंत मेळाव्याच्या माध्यमातून पोहचविणार असल्याचे हक्क परिषदेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी जळगाव येथे जिल्हास्तरीय बेठकीत प्रतिपादन केले.

जळगाव येथील भोईराज हॉल येथे दि.23जून रविवार रोजी दुपारी 12 वाजता झालेल्या* *बेठकीत जेष्ठ मार्गदर्शक एस. के. भोई, ए. के भोई संजय गोसावी,जिल्हाध्यक्ष शालीकराम पवार,सचिव संदीप घुगे, मल्लू पवार महानगरअध्यक्ष सुरेश भाट, नरेश बागडे, भानुदास जोशी, राहुल नेतलेकर,विजय अभगे,सुनील लाड,कडू धनगर,अर्जुन भोई,मंगल सोलकी, डॉ.सुरेंद्रकुमार स्वामी,महिला अध्यक्षा निर्मला शिंदे,विना शिंदे,दीपमाला बाटूगे, आदी मान्यवर उपस्थित होते


श्री काळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की या भटक्या विमुक्त 53 जातीच्या लोकांना आजही मूलभूत सुविधा मिळत नसून 10 वी 12 विचा निकाल नुकताच लागल असून अनेकांना

 शासनांच्या जाचक अटीमुळे जातीचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याचे त्यांनी व्यक्त केले. यासह भटके विमुक्त हक्क परिषदेचे उद्धिष्ट व ध्येय , 

परिषदेची संघटनात्मक रचना परिषदेची कार्यपद्धती परिषदेच्या कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता या बाबत अत्यंत मुद्देसूद पणे मार्गदर्शन करून जिल्हा तालुका व ग्राम समित्या पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात शिक्षक आघाडी चे विभागीय अध्यक्ष संजय गोसावी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 या बाबत मार्गदर्शन केले


यावेळी जळगांव जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष म्हणून राहुल नेतलेकर,महानगर उपाध्यक्ष विजय अभंगे
तसेच जिल्हा संघटकपदी मंगल शोलकी, व नितीन सोनवणे यांची निवड करण्यात आली


कर्यक्रमचे सुत्रसंचलन संदीप घुगे, आभार सुरेश भाट यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध