Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ जून, २०१९

राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा



फैजपूर प्रतिनिधी :(राजू तडवी )

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने इंटरनॅशनल डे ऑफ ड्रग अब्युज साजरा करण्यात आला. या प्रसंगी एन सी सी कडेट्स यांनी फैजपूर शहरातून रॅली काढून ठिकठिकाणी नुक्कड नाटिका सादर केली.

१८ महाराष्ट्र बटालियन एस सी सी जळगाव चे समादेशक अधिकारी मा कर्नल सत्यशील बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे एन सी सी अधिकारी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपुत यांनी अंमली पदार्थांना आळा बसावा आणि समाज निकोप, आरोग्यदायी आणि भरभराटीकडे प्रवास करणारा असावा या उद्देशाने फैजपूर शहरात रॅली काढली. रॅली दरम्यान नशाबंदीच्या  घोषणांनी शहर दणाणून उठले.



बस स्थानक तथा विविध कॉलनी मध्ये जाऊन एन सी सी कडेट्स यांनी नुक्कड नाटिका सादर केल्या आणि नशा बंदीचा संदेश घराघरात पोहोचविला. नुक्कड नाटिकेत नशा कशी जीवनाला बरबाद करते आणि स्वतःला नशे पासून अलिप्त राखण्यासाठी काय केले पाहिजे हे काल्पनिक पात्राच्या माध्यमातून समजावून सांगितले.

यावेळी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरिषदादा चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.



कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सपकाळे, शेखर महाजन , चेतन इंगळे, सुधीर पाटील, संजय बाऱ्हे, तौसिफ तडवी, महेश पाटील, दुर्गेश महाजन, नितीन पाटील यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध