तीन वर्षापुर्वी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबींचा पाठपुरावा
शिरपुर(प्रतिनिधी)संजय गांधी निराधार अनुदान योजना,इंदीरा गांधी वृध्दापकाळ योजना व श्रावणबाळ योजनेंतर्गत दरमहा 600 रु.मानधन दिले जाते त्या ऐवजी त्यात वाढ करून 1000 रु मिळावे यासाठी तीन वर्षापुर्वी दि.24/5/2016 रोजी माजी
समाज कल्याण मंत्री मा.श्री.राजकुमार बडोले यांची त्यांचा दालनात मंत्रालय मुंबई येथे भेट घेवुन निवेदन देण्यात आले होते.भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष श्री.बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थित भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी माजी समाज कल्याण मंत्री
मा.श्री.राजकुमार बडोले यांचेकडे लाभार्थींना अनुदान योजनेच्या रक्कमेत वाढ करावी अशी मागणी केली होती.मा.श्री.राजकुमार बडोलींनी मंत्रीमंडळ बैठकीत सातत्याने महत्वपूर्ण पाठपुरावा करत मानधनात वाढ करण्याबाबतची गरज शासनाच्या निर्दशनास आणून दिली.त्या प्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला असुन अर्थमंत्री
मा.ना.श्री.सुधीरजी मुनगंटीवार यांनी नुकताच अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपये निधीची तरतूद केली असुन रु.400 मानधनात वाढ करण्यांत आली आहे.त्यानुसार आता लाथार्थींना रु.1000 मिळणार आहे.या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा रु.600 अनुदान देण्यात
येते.महागाईच्या काळात हे अनुदान पुरेसे नाही म्हणुन योजनांच्या अनुदानात वाढ करुन रु.1000 मिळावे अशी वेळोवेळी मागणी भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी माजी समाज कल्याण मंत्री मा.श्री.राजकुमार बडोले यांचाकडे केली होती.मागील अनेक वर्षापासुन राज्यातील लाभार्थ्यांना देण्यात येणार्या अनुदानात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.प्रलंबित मागणी मान्य
झाल्यामुळे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस,अर्थमंत्री मा.ना.श्री.सुधीरजी मुनगंटीवार यांचे जनतेच्यावतीने भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी आभार मानले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा