Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३० जून, २०१९

प्रतिनिधी : जळगावच्या एम.जे. कॉलेजमध्ये तरुणाचा भरदिवसा खून, क्षुल्लक कारणावरून छातीत केले चॉपरने वार



 पार्किंगमध्ये धक्का लागल्याने झाला वाद, आरोपींनी 25 गुंड बोलावले



जळगाव:प्रतिनिधी (शिवाजी पारधी)  येथील एम.जे. महाविद्यालयात एका तरुणाचा भरदिवसा खून करण्यात आला आहे. पीडित युवक (23) आपल्या एका भावासह महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी आला होता. त्याचवेळी पार्किंगमध्ये ट्रिपल सीट आलेल्या तरुणांना धक्का लागला. यातून वाद इतका वाढला

 की आरोपींनी तरुणाचा चॉपरने वार करून खून केला. दरम्यान यावेळी झालेल्या भांडणात काही तरुण जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.




असोदा येथील मूकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे हा मूजे महाविद्यालयात तृतीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे घेवून त्याचा सेवा सुविधा केंद्राचे काम करणाऱ्या भावासोबत आला होता. यावेळी मुकेशचा भाऊ रोहित याच्या दुचाकीचा तीन तरुणांना धक्का लागल्याने त्यांच्यात वाद झाला. त्याच तीन युवकांनी मुकेश आणि रोहित यांना मारण्यासाठी 20 ते 25 गुंड बोलावले. त्या सर्वांनी दोन्ही भावांना हबेदम मारहाण केली. त्याच दरम्यान मुकेशचे देखील मित्र पोहोचले. परंतु, हाणामारीत एकाने मुकेशच्या छातीत चॉपरने वार केले. यात मुकेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

 दरम्यान, या हाणामारीत जखमी झालेल्या इतरांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली. तसेच पुढील तपास रामानंद नगर पोलिस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध