गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
प्रतिनिधी :(विशाल डुकरे )
तुळजापूर : बऱ्याच विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीवर मात करून यश संपादन केले आहे, ९०% पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे लोकमंगल पालकत्व घेऊन उच्चशिक्षणासाठी वडाळा येथे मोफत शिक्षण दिले जाईल असे प्रतिपादन लोकमंगल मल्टीस्टेटचे चेअरमन, भाजप युवा नेते रोहन देशमुख यांनी केले.
तुळजापूर येथे लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी लि. सोलापूर, शाखा तुळजापूर च्या वतीने १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते, पुस्तकी ज्ञानासोबत व्यवहारिक ज्ञान देखील संपादन करा, गुणवंत गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या पाठीशी मोठा भाऊ या नात्याने खंबीरपणे उभा राहीन, माझ्या जन्मगावासाठी, तिथल्या लोकांसाठी जमेल ते सर्व करण्यासाठी, विधेयक काम करण्यासाठी माझी तळमळ राहील असे रोहन देशमुख यांनी बोलताना सांगितले. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तुळजापूर मधील १० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्या प्रसंगी उस्मानाबाद जि. प. गटनेते ज्ञानदेव राजगुरू, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, लोहारा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनकर पाटील, तुळजापूर खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी बोधले, भाजप शहराध्यक्ष सुहास साळुंखे, काटीचे सरपंच आदेश कोळी, प्रदीप साळुंके, मानाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा