Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ जून, २०१९

पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध


रावेर (प्रतिनिंधी) अजीज शेख  दि.२७ जळगांव येथील पत्रकार संतोष ढिवरे यांना माहीती मिळाली की,एकास डांबून मारहाण होत असल्याच्या घटनेची विचारपूस व बातमी घेण्यासाठी घटना स्थळावर  गेलेले  येथील पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर करिष्मा हॉटेल चे मालक व दहा बारा गुंड प्रवृत्तीच्या वेटर लोकांनी  जबर मारहाण करून प्राण घातक हल्ला केला.यांच्या निषेधार्थ आज रावेर येथील तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना रावेर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जळगाव येथील पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर करिष्मा हॉटेल चे मालक व दहा बारा गुंड प्रवृत्तीच्या वेटर लोकांनी  जबर मारहाण करून प्राण घातक हल्ला केला.त्यात त्यांना मार लागला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल होते.बातमीसाठी गेलेले संतोष ढिवरे पत्रकार हे वारंवार पत्रकार असल्याचे सांगत होते. तरी देखील तेथील दहा बारा लोक जबर मारहाण करीत होते.या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे दिनांक २० जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना दिनांक २० जून २०१९ दुपारी घडली असून दिवसा ढवळ्या पत्रकारांवर  असे प्राण घातक हल्ला  करण्याचा प्रकार घडला असून आम्ही रावेर तालुक्यातील पत्रकार या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहोत.या घटनेतील आरोपीना कडक कारवाई करावी व भविष्यात असे हल्ले पत्रकारांवर होणार नाही या करिता आपल्या स्तरावरून प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले..

तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार देवलाल पाटील,प्रदिप वैदय,कुमार नरवाडे,सुनिल चौधरी,राजेंद्र अटकाळे,प्रकाश पाटील, वासुदेव नरवाडे,नुर मोहम्मद तडवी,शरीफ शेख, शेख अजीज,हमीद शेख,युसुफ खाटीक, रमेश पाटील यांच्या सहया आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध