Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ जून, २०१९



जात, धर्म, आर्थिक स्तर न पाहता 'सीनिअर सिटीझन'ना पेन्शन; बिहार ठरलं पहिलं राज्य.

आयुष्याच्या संध्याकाळी सगळ्याच आजी-आजोबांना एक हक्काचा आधार हवा असतो. शरीर थकलेलं असतं, मनालाही उमेद हवी असते आणि काही जणांना आर्थिक पाठबळही गरजेचं असतं. अशाच ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहारमधील नितीशकुमार सरकारनं 'युनिव्हर्सल ओल्ड एज पेन्शन स्कीम' सुरू केली आहे. त्या अंतर्गत, जात, धर्म किंवा आर्थिक स्तर न पाहता ६० वर्षांवरील ज्येष्ठांना सरकार दरमहा पेन्शन देणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना आहेत. परंतु हे निवृत्तीवेतन केवळ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना, एससी/एसटींमधील वृद्धांना, विधवा आणि दिव्यांगांना दिलं जातं.बिहार सरकारने हे सगळे निकष काढून टाकलेत. सरकारकडून सध्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही स्वरूपाचं निवृत्तीवेतन मिळत नाही, त्या सर्वांना मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ४०० रुपये पेन्शन दिली जाणार आहे.‘संवाद’, मुख्यमंत्री सचिवालय, पटना में ‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ४०० रुपये पेन्शन दिली जाणार आहे.


बिहारमधील सुमारे ३५ ते ३६ लाख ज्येष्ठ नागरिकांना यापेन्शन योजनेचा लाभ होणार आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर १८०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल, अशी माहिती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली. बिहार मंत्रिमंडळाने या योजनेसाठी ३८४ कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे


सेफ्टिक टँकमध्ये श्वास गुदमरून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू

 गुजरातमधल्या बडोदा जिल्ह्यात एका हॉटेलमधील सेफ्टिक टँक साफ करत असताना घुसमटून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचीनोंद दभोई पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलीस कर्मचारी, अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य राबवण्यात आलं असून, तक्रारही नोंदवण्यात आली आहे.बडोदा शहरापासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दभोई तहसीलच्या फर्तिकुई गावातल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दभोई तालुक्यातील थुववी गावातील चार जण सेफ्टिक टँक साफ करण्यासाठी टाकीमध्ये उतरले होते.

जेव्हा एक सफाई कर्मचारी मॅनहोलमधून बाहेर आला नाही, तर इतर जण त्याला पाहण्यासाठी टाकीत उतरले आणि सगळ्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेत हितेश हरिजन (23), त्यांचे वडील अशोक हरिजन (45), महेश हरिजन (25), महेश पन्नवाडिया (46), विजय चौधरी (22), शाहदेव वसावा(22) आणि एकाचं नाव अजय असं आहे. याघटनेनं दभोई परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 शरद पवारांच्या बैठकीतुन उदयनराजे भोसले तडकाफडकी बाहेर पडले. 


नीरेच्या पाण्यावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून हा वाद शमावा यासाठी शरद पवारांनी शनिवारी बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली आहे. उदयनराजे हे चिडून बैठकीत बाहेर पडल्याने त्यांच्यातील वादावर तोडगा निघू शकला नाही.नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी उदयनराजेंवर खालच्या पातळीवरील टीका केली होती. स्वयंघोषीत छत्रपती, चक्रम असे शब्दप्रयोग त्यांनी उदयनराजेंबाबत काढले होते. तसेच पक्षाचे नेते शरदपवार यांच्याकडे उदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू असा इशारा दिला होता. दरम्यान,उदयनराजेंवरील टीका सहन न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी शनिवारी साताऱ्यात रामराजेंचा पुतळाही जाळला. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला जाऊ नये यासाठी शरद पवारांनी मुंबईत शनिवारी दुपारी या दोन्ही नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते.मात्र, बैठक सुरु झाल्यानंतर काही वेळातच चिडलेले उदयनराजे बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट पत्रकारांशी बोलताना आपली भुमिका मांडली. ते म्हणाले, ‘रामराजेंनी माझ्यावर स्वयंघोषीत छत्रपती अशी टीका केली. मी स्वयंघोषीत छत्रपती नाही लोकांनी त्यांच्या मनात मला ते स्थान दिले आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मी कधीही वैयक्तीक स्वार्थासाठी वापर केला नाही. रामराजेंनी मला चक्रमही म्हटलं, हो मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतो. मला अन्याय सहन होत नाही त्यामुळे मी स्वपक्षीयांवरही बोलतो त्याला घरचा आहेरही म्हटलं जातं.’‘तुम्ही सभापती आहात ना तर तसे वागा असा सल्ला देताना तुम्हाला कोणाशी काय बोलायचंय ते बोलून घ्या, पुढचं नंतर बघू’ असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. दरम्यान, रामराजेंचा उल्लेख पिसाळलेलं कुत्रं असा करीत, बरं झालं मी बैठकीतून बाहेर पडलोअन्यथा हे कुत्रं मलाही चावलं असतं, अशा खालच्या शब्दांत उदयनराजेंनी रामराजेंवर हल्लाबोल केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध