Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०१९
नळदुर्ग (प्रतिनिधी विशाल डुकरे) पवित्र अशा श्रावण महीन्यात जोतीर्लिंगाचे दर्शन घडवण्यासाठी संपूर्ण श्रावण महीन्यात तुळजापूर विधान सभा मतदार संघातील 180 गावातील
सुमारे 15 हजार महीलांची मोफत देव दर्शन यात्रा करण्यात येणार आसल्याची माहीती तुळजापूर तालुक्याचे नेते अशोक जगदाळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्रावण महीन्यात महीला या जोतीर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात, त्या महादेवाचा मोठया प्रमाणात उपवास
करतात, शिवाय संपूर्ण महीना बहूसंख्य महीला उपवास करतात त्यामुळे या महीन्यात खास करुन महीलांसाठी देव दर्शन यात्रा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान या संदर्भात पत्रकार परिषदेत माहीती देताना तुळजापूर तालुक्याचे नेते अशोक जगदाळे यांनी म्हटले की, श्रावण महीन्याचे महत्व लक्षात घेता बारा जोतीर्लिंगा पैंकी एका
जोतीर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी एक दिवसाची देव दर्शन यात्रा महीलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा तुळजापूर विधान सभा मतदार संघातील महीलांसाठी असून या यासाठी वय वर्षे 45 ते 60 वयो गटातील महीलांसाठी ही यात्रा आहे. दरम्यान यासाठी महीलांची तुळजापूर तालुक्यातील 108 गावातील आणि
उस्मानाबाद तालुक्यातील 72 गावातील अशा 180 गावातील महीलांसाठी या यात्रेत सहभाग असणार आहे. एका गावातून 50 महीला या यात्रेसाठी निवडल्या जातील शिवाय यासाठी प्रत्येक गावात एक लक्झरी बस पाठवण्यात येणार आहे. दरम्यान श्रावण महीन्यात प्रत्येक दिवशी एका
जिल्हा परिषद गटामध्ये दहा लक्झरी बस मधून या महीलांना देव दर्शन करण्यासाठी परळी वैजीनाथ येथे घेवून जाण्यात येणार आहे आणि त्या दिवशी दर्शन करुन परत संध्याकाळी आपल्या गावी आणून
सोडण्यात येणार आहे. अशी ही देव दर्शन यात्रा असून या माध्यमातून सुमारे 15 हजार महीलां या देव दर्शन करण्यासाठी घेवून जाण्याचा प्रयतन असणार आहे. त्याच बरोबर या देव दर्शन यात्रेचा प्रतिसाद पाहून आणखीन ही जास्त महीलांना देव दर्शन घडवण्याचा प्रयत्न राहील असे ही जगदाळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान यावेळी या यात्रेत सकाळी आपल्या
गावातून निघून दुपारी बारा ते एक वाजे पर्यंत परळी येथे पोहचून त्या ठिकाणी परळी वैजीनाथ जोतीर्लिंगाचे दर्शन घेतल्या नंतर दररोज परळी येथे पाचशे महीलांची भोजनाची सोय करण्यात आली आहे. दरम्यान परळी मध्ये भोजन केल्या नंतर ही देव दर्शन यात्रा परतीच्या मार्गाला लागेल आणि संध्याकाळी त्यांच्या गावी त्यांना सोडण्यात येईल असे या देव दर्शन यात्रेचे स्वरुप आहे.
तुळजापूर तालुक्यातच काय तर उस्मानाबाद जिल्हयात इतक्या मोठया प्रमाणात तब्बल एक महीना महीलांसाठी दहा लक्झरी बस मधून देव दर्शन यात्रा काढणारे अशोक जगदाळे एकमेव नेते आहेत, यापूर्वी कोणत्या ही
लोकप्रतिनीधींनी अशी यात्रा आयोजित केली नाही मात्र अशोक जगदाळे यांच्या या उपक्रमामुळे संपूर्ण तुळजापूर तालुक्यात व विधान सभा मतदार संघात प्रत्येकांच्या घरात पोहंचणार आहेत, समाज हिता बरोबर धार्मीक हित ही या माध्यमातून अशोक जगदाळे यांनी कोणत्याही प्रकारचा मनात स्वार्थ न बाळगता जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा