Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जुलै, २०१९

पिक विमा तक्रार निवारण समितीची शिंदखेडा तहसीलला बैठक संपन्न




शिंदखेडा प्रतिनिधी जिल्ह्यासह राज्यभरात पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी दरवर्षी प्रशासनाला प्राप्त होतात या तक्रारींचे निरसन करण्यासाठी शासनाने तालुका स्तरावर समिती गठीत केली असून तालुकास्तरीय समिती ची पहिली बैठक येथील तहसील कार्यालयात नुकतीच घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार बी ओ बोरसे होते 

प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारण्यासाठी शासनाने 12 जुलै 2019 रोजी तालुकास्तरावर समिती गठित केली असून शिंदखेडा तालुका शेतकरी तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष पदी तहसीलदार सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली आहे दरम्यान या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर चर्चा विनिमय करण्यात आली पिक विमा योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी या विषयावर देखील चर्चा करण्यात आली तालुका कृषी 

अधिकारी विनय बोरसे यांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात विमाहप्ता विमा संरक्षण व विमा भरल्यामुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे या विषयी मार्गदर्शन केले शिंदखेडा तालुक्यासाठी निवडण्यात आलेल्या आजच्या बैठकीत नायब तहसीलदार 

भीमराव बोरसे अध्यक्षस्थानी होते याप्रसंगी मंडळ अधिकारी भालचंद्र देसले नवनाथ साबळे धनंजय पाटील अग्रणी बँकेचे तालुका प्रतिनिधी श्रेयस देशपांडे डीसीसी बँकेचे डीपी चौधरी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे प्रशांत आहिरे आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचे प्रतिनिधी विनायक पवार शेतकरी प्रतिनिधी एडवोकेट प्रकाश पाटील आदर्श शेतकरी श्रीराम पाटील आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध