Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३० जुलै, २०१९

मोरवणात कुलाचार्यांच्या हस्ते महावृक्षारोपण




प्रतिनिधी :- (योगेश्वर मोरे) ( वृक्षमित्र व वन्यजीव संरक्षण संघटन, वनविभाग धुळे) 



शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेच्या संकल्पनेतून तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी वनविभाग व रणाईचे सर्वांगीण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अंदाजे 5000 वृक्षांचे रोपण तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रणाईचे गाव हद्दीत असलेल्या मोरवणात तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या तर 

विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देत शाळेच्या प्रांगणात महावृक्षारोपण करून बालगोपालांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनीच एक आदर्श निर्माण केला. विद्याथ्याच्या रुपात अनेक हात पुढे आले, म्हणूनच हे महावृक्षारोपणासारखं मोठं कार्य करता आले
अमळनेर तालुक्यातील रणाईचे ह्या गावाची प्रथम ओळख ही धार्मिक वारस्यावरून होते. पहिला महानुभाव पंथ तर दुसरा कबीर पंथ तसेच बंजारा समाजाचे नर्मदेश्वर महादेव मंदिर ही आहे. या पंथांच्या 

वारस्याने हे गाव पावन आहेच. परंतु यात वेगळं आहे ते मोरवन (वनीकरण क्षेत्र) यात विविध प्रजातींचे , वनस्पतींची वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. सोबत मोरवणात मोठ्या संख्येने मोर आपली उपस्थिती दाखवीत असतात, तसेच परिसरात हरण देखील आहेत. समस्या एकच ती म्हणजे पाणी सतत ३ ते ५ वर्षांपासून दुष्काळाशी दोन करण्याचे दुर्दव स्थिती अमळनेर 
तालुक्याच्या नशिबी आली आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी रणाईचेत दि. २३ जुलै रोजी कुलाचार्य प. पु. परममहंत श्री. वर्धनस्य बिडकर बाबा (मोठे बाबा) महानुभाव यांच्या हस्ते 


महावृक्षारोपणांचा शुभारंभ झाला. तर ग्रामस्थांनी व शाळकरी विद्यार्थ्यांनी मोरवणात, गावात, शेतात व शाळेच्या प्रांगणात सामुदायिक वृक्षारोपण केले. 
या महावृक्षारोपणाच्या मोहिमेत रोपांसाठी विशेष सहकार्य वनविभाग बोराडी चे वनपाल श्री. संदीप मंडलिक (अध्यक्ष - वनरक्षक वनपाल संघटना, वनवृत्त - धुळे, महा. राज्य), वनरक्षक श्री. धिरज सोनार (सदस्य- वनरक्षक वनपाल संघटना महा. राज्य ), श्री. योगेश्वर मोरे (प्रमुख - कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंच ), संघणक 
परिचालक - श्री. योगेश पवार व वनविभाग पारोळा चे नरेंद्र पाटील, विशाल साळुंखे व रणाईचे ग्रामस्थ तसेच रणाईचे गावासाठी सर्वोत्तपरी तत्पर, कर्तव्य कार्यक्षम अशी भूमिका बजावणारे गावातील तरुणांचे सोशल मीडिया संघटन रणाईचे व परिसर सर्वांगीण विकास मंच या सर्वांच्या 
सहकार्याने रणाईचेत महावृक्षारोपणाचा अविस्मरणीय उपक्रम पार पडला.
प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री. भटेसिंग राजपूत यांनी रणाईचे व परिसर सर्वांगीण विकास मंच या युवा संघटनाच्या कौतुकास्पद उपक्रमाला प्रथम पारितोषिक स्वरूप सन्मानचिन्ह देऊन सदस्यांना गौरविण्यात आले. सोबत आपल्या मनोगतातून रोपण केलेल्या वृक्षाला दत्तक घेऊन त्याची जोपासना करून एक 
वर्षानंतर लावलेल्या वृक्षाचा संगोपन अहवाल ग्राम पंचायतीला सादर करावा. जेणे करून प्रशासनाला रणाईचे गावाच्या कार्याची वेगळी ओळख यानिमित्ताने होईल आणि संगोपणातून वाढवलेल्या दत्तक वृक्षांना व गावाला शासनाच्या गाव विकासासाठी विविध योजनांचा विशेष लाभ मिळेल, जेणेकरून ग्रामस्थांना व युवा पिढीला शासनाच्या योजना राबविण्याची प्रेरणा मिळेल.
सर्वांच्या सहकार्याने वृक्षारोपनाचे काम पूर्ण झालेले असले तरी केवळ रोप लावून, पाऊस पडणार नाही किंवा दुष्काळ संपनार नाही. वृक्षसंवर्धन हे निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. ROOT संकल्पने अंतर्गत संदिपकुमार साळुंखे (अप्पर आयुक्त - 
आयकर विभाग, औरंगाबाद ) सरांच्या मार्गदर्शनाने रणाईचे व परिसर सर्वांगीण विकास मंचा मार्फत माळण नदीजोड पुर्णजिवीकरण, पाझरा-माळण नदीजोड व पाणी वाचवण्यावरही विशेष लक्ष देत आहोत. वृक्ष जगावे म्हणूनच आपण ८०% रोप ग्रामस्थानां स्वताहाच्या जागेत व केवळ २०% सार्वजनिक ठिकाणी देत आहोत. या कार्यातुन आपण काय साध्य केले, हे येणारा काळच ठरवेल. तरी दुष्काळाशी दोन हात करणाऱ्याच्या या कार्यात काही सुंदर बदल गावात घडले, ते म्हणजे गावातील 
सर्वाकडुन आपआपल्यापरीने मिळालेला प्रतिसाद, विषेशतः विद्यार्थी व तरुणांचा पुढाकार, वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक जाणिवेतून सुरु केलेली मदत, अतीशय प्रतीकुल परिस्थितीतुन कमी वयात महाराष्ट्र विभूषण पुरस्काराने सन्मानीत भटेसिंग राजपुत यांच्यासारखे प्रेरणादाई अतिथी, तसेच त्यांनी आपल्या गावासाठी स्वच्छता अभियान, बेटीबचाव चळवळ, तंबाखुमुक्त शाळा अश्या विविध 
ऊपक्रमासाठी नवतरुणांच्या सहकार्याने केलेला संकल्प, पुन्हा एकदा वाघ बापु साहेबांनी महिलांचा केलेला गौरव व चांगल्या कामासाठी रणाईचे गावाचा मांडलेला इतीहास, पुर्ण गावाने एकत्र येत राजकारण विरहित केलेल कार्य हे महत्वाचे ठरले. 
 यावेळी सोहळ्यात योगेश्वर मोरे यांना शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागासाठी राबविलेल्या स्वच्छता अभियानाच्या विशेष कार्याबद्दल भारत सरकार व क्रीडा मंत्रालय संलग्नित नेहरू युवा केंद्र धुळे यांचे 
प्रतिनिधी भटेसिंग राजपूत यांच्यावतीने भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. 
संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वच्छतेचे अविरत कार्य आपल्या हातून घडो अश्या सदिच्छा उदयजी यांनी दिल्या व या मोहिमेस खास उपस्थिती महिला बघिणीची असल्याने बापूंनी सर्व उपस्थित महिला सदस्यांना साडी चोडीचा आहेर भेट देण्याची घोषणा करून गौरविण्यात आले. तसेच महावृक्षारोपणाच्या कार्यास रोख रक्कम 5001 रुपयांची मदत केली.
या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विभूषण पुरस्काराने सन्मानित श्री. भटेसिंग राजपूत ( भारत सरकार व क्रीडा मंत्रालय संलग्न स्थित तालुका समन्वयक - नेहरू युवा केंद्र, धुळे ), श्री. योगेश्वर मोरे ( प्रमुख - कुरखळी ग्राम विकास मंच व सदस्य - वन्यजीव संरक्षण संघटन ), 
भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ, तालुका कृषी अधिकारी वारे साहेब, माजी कृउबास प्रफुल्ल पाटील, सरपंच रणाईचे, सरपंच जानवे, नाटेश्वर पाटील, ग्रामसेवक आर एन वाघ , ग्रा. पं. सदस्य व कर्मचारी, पाणी फौंडेशन टीम, जि. प. मराठी शाळा, माध्यमिक शाळा, अण्णासो मालोजीराव पाटील स्थित आश्रम शाळा सर्व 
मुख्याध्यापक, सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, महानुभाव प्रणवाश्रम रणाईचे येथील साधक, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेवार्थी, महिला बचत गट, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहकारी, वृक्ष मित्र , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध