Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ७ जुलै, २०१९

अमळनेर..शिवशक्ती चौक येथिल लक्ष्मी टाकी जवळील उध्वस्त मटन मार्केट परिसर दुर्गधी आणि रोगराई युक्त.....



नगरपालिका प्रशासन तिकडे फिरकेल का????

मटन मार्केट सभासद आणि नागरिकांचा बोचरा सवाल...

 अमळनेर :  प्रतिनिधी  (संदीप सैदाणे) रविवार हा सुट्टीचा दिवस असून अमळनेर शहरातिल ६०% नागरिक,रहीवाशी रविवार हा "" मटन डे""म्हणुन साजरा करतात.शेकडो बोकड रविवारी फस्त केले जातात.हे सर्वश्रुत आहे.अनेक पुढारी,अधिकारी,शिक्षक,नोकरदार,समाजरक्षक,शेतकरी,कर्मचारी,व्यवसाईकांचा राबता बोकड मार्केटमध्ये दृष्टीस पडतो.

  मार्केटचे वातावरण हे अत्यत किळसवाने,दुर्गंधियुक्त असून पावसाळ्याच्या दिवसात तेथे विषाणुसंसर्ग होण्याची दाट शक्यता अाहे..मार्केटचा विकास व्हावा,तेथे साफसफाई करावी,न.पा.मध्ये तरतुद करून मच्छी मार्केट जसे स्वच्छ आणि आधुनिक झाले तसे बोकड मार्केट बनवावे ही अनेक वर्षापासुनची मार्केट सदस्याची व नागरिकांची मागणी आहे...ते काम 

अमळनेरचे विकासपुरूष,दूरदृष्टी असलेला नेता,माजी आमदार,मा कृषीभुषण दादा करतिल अशी भाबडी आशा मार्केट मध्ये दुकान लावणार्या दुकानदार सदस्यांना होती.ती फोल ठरली...माननिय 

नगराध्यक्षा,मुख्याधिकरी महोदयव स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्मचारी ,आरोग्य सभापती,आरोग्य अधिकारी,यांना घेउन बोकड मार्केटकडे यावे अशी आर्त हाक आपल्याला अमळनेरकर  नागरिक देत आहेत.

रहीवाशांची ही मागणी अत्यंत जलदगतीने व अतितातडीने मार्गी लागेल आणि संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळेल हिच अपेक्षा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध