अमळनेर :प्रतिनिधी (संदीप सैदाणे) स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे पूर्ण परंतु आजही आदिवासी समाज बेघर असून रेशन कार्ड नाहीत जातीचा दाखला नाही रोजगार नसल्यामुळे भूक बळी होण्याची वेळ आली असल्याने आदिवासी संघटनांनी प्रांत
कचेरीवर मोर्चा काढून प्रांताधिकारीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना रिकामे ताट वाटी व विविध मागण्यांचे निवेदन दिले
राजपुत्र एकलव्य
सेना ,आदिवासी एकता परिषद तसेच विविध संघटनानी सुभाष चौकातून बसस्थानक मार्गे प्रांत कचेरीवर मोर्चा काढला मोर्चाचे नेतृत्व एकलव्य सेना प्रमुख राज साळवी , यांनी केले होते प्रांत कचेरीवर मोर्चा आल्यानन्तर मोर्चाला बाहेर
अडवण्यात आले प्रांताधिकारिनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे असा हट्ट मोर्चेकरांनी घेतला प्रांताधिकारींनी नायब तहसीलदार चौधरी ,दिनेश सोनवणे याना प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन
स्वीकारण्यास बाहेर पाठवले मात्र नंतर राज साळवी , अनिल पाटील यांनी कार्यालयात जाऊन काही प्रातिनिधिक महिलांसोबत ताट वाटी ताटली देऊन निवेदन दिले निवेदनात खावटी कर्ज वाटप करून 5 हजार रूपये मिळावेत , आदिवासींचे
दाखले इतर कोणत्याही समाजाला देऊ नये , प्रकल्प कार्यालय अमळनेर येथे व्हावे भूमिहीन आदिवासी कुटुंबांना 10 एकर जमीन वाटप करन्यात यावी , बेघराना जागा देण्यात यावी, आदिवासी कुटुंबांना दारूबंदी अधिनियम 1949 नुसार 5 लिटर दारू
ठेवण्याचे अधिकाराची अमलबजावणी करावी , स्थानिक पातळीवर मच्छिमार करण्यासाठी तलाव , धरणांचा ताबा द्यावा ,अतिक्रमित गायरान , गावठाण वनीकरण जमिनीवर शेतीसाठी झालेले अतिक्रमण पिकपेरे लावून नियमित करावे या सह अनेक मागण्यांचा समावेश होता
शिष्टमंडळ प्रांताधिकारीनशी चर्चा करीत असताना आदिवासी बांधवांनी पोलिसांना न जुमानता तहसील कार्यालयाचे गेट तोडून आत मध्ये प्रवेश करून घोषणा दिल्या तसेच थालिनाद केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा