Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ६ जुलै, २०१९

नळदुर्ग मध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन



नळदुर्ग :प्रतिनिधी (विशाल डुकरे ) प्रतिवर्षाप्रमाणे नळदुर्ग येथील आर्दश शिक्षक श्री.वसंतराव अहंकारी ( गूरूजी ) यांच्या निवासस्थानी दि.१० जूलै ते १६ जूलै २०१९ या दरम्यान " भागवत सप्ताहाचे " आयोजन केलेले आहे..

१९७४ पासून सुरु झालेल्या या भागवत सप्ताहाचे यंदाचे हे ४५ वे वर्ष आहे. वेद शास्त्र संपन्न श्री.श्रीराम जोशी  केज  यांच्या अमृतवाणीने सात दिवस भागवत कथा सांगितली जाते...रोज सकाळी ८ ते ११ 

संहिता वाचन  संस्कृतमध्ये  आणि दुपारी ३ ते ६ भागवत कथा मराठीतून सांगितली जाते.. यावेळी रोज शेकडो नागरिक विशेष करून महिलावर्ग मोठया प्रमाणात कथा श्रवण करण्यासाठी येतात.. गूरूपौर्णीमेच्या दिवशी या भागवत सप्ताहाची समाप्ती असते.. यावेळी भावीक भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते..

तरी नागरिकांनी या भागवत सप्ताहाचा लाभ घ्यावा असे अव्हान श्री.बाबूराव अहंकारी..श्री.वसंतराव अहंकारी. श्री.बळवंत अहंकारी.. व नळदुर्ग नगरीचे नगरसेवक विनायक अहंकारी  यांनी केलेले आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध