Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ६ जुलै, २०१९

फैजपूर भाजपा तर्फे सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.




प्रतिनिधी :(राजु तडवी) भारतीय जनता पार्टी फैजपूर शहर तर्फे आज दि.०६ शनीवारी संध्याकाळी ०४ वाजता दिपाली गृप्स कार्यालय सरदार वल्लभभाई पटेल व्यापारी संकुल या ठिकाणी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रतिमा पुजन ज्येष्ठ नेते व प्रदेश सदस्य 

श्री.बी.के.चौधरी यांनी केले.मरेखां तडवी यांच्या मोबाईलवरून सदस्य नोंदणी नंबर वर मिस्ड कॉल करुन नोंदणी ला सुरुवात करण्यात आली तसेच यावेळी गौरव पाटील यांचा संगणकावर फॉर्म भरून संगणकीय सदस्य नोंदणी देखील करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष श्री.पी के चौधरी, शहराध्यक्ष संजयजी रल, सरचिटणीस संजय सराफ, खान्देश नारीशक्ती गृप 

अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, भाजपा ता.उपाध्यक्षा सौ.संगिता चौधरी, राष्ट्रीय नमो सेना जिल्हाध्यक्ष श्री संदीप पाटील,ज्येष्ठ सदस्य रघुनाथ काका कुंभार, संजय 

भावसार, मा‌.शहराध्यक्ष युवराज चौधरी, गुळवे सर,मरेखां तडवी, संदिप सपकाळे, जितेंद्र इंगळे, प्रतिक वारके,रुपम महाजन, अरविंद पांडे, भुषण इंगळे, संदिप खत्री, गौरव पाटील, राजेंद्र रल,कार्तिक रल इ.उपस्थित होते.सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध