Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ५ जुलै, २०१९

आदिवासी पारधी महासंघ (उत्तर महाराष्ट्र) पदाधिकाऱ्यांचे विविध विषयांवर एक दिवसीय चिंतन शिबीर




 अमळनेर : प्रतिनिधी (गणेश चव्हाण)          आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी सामाजिक,राजकीय भूमिका लक्षात घेता विविध विषयांवर आदिवासी पारधी महासंघ(उत्तर महाराष्ट्र) 

पदाधिकाऱ्यांची चिंतन शिबिर दि.७/७/2019 वार रविवार रोजी ,वल्लभदास वालजी वाचनालय,रेल्वे स्टेशन,जळगाव येथे घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीत आदिवासींसाठी 

राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणेकामी सरकारवर आंदोलनात्मक दबाव तयार करणे यासह खालील विषयांवर चर्चा होणार आहे .

चर्चिले जाणारे विषय:-

१)2022 पर्यंत आदिवासी पारधी समाजातील प्रत्येक कुटुंबाला घरकुल व शेतजमिनी मिळाल्या पाहिजे.

2) गरीब पारधी कुटुंबासाठी संघटनेच्या 

माध्यमातून उद्योग उभारणे 

३)सामुहिक विवाह सोहळाचे आयोजन करणे 

४)महिलांसाठी आरोग्य  शिबिर घेणे व पारधी समाजातील नवीन तरूण 

मुला मुलींना शैक्षणिक व लहान मोठे लघु उद्योग उभारणे.

५)पारधी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे 

६)विभागीय मेळावे / नवीन शाखा फलकांचे 

अनावरन करणे. 

७)पारधी समाजातील शिक्षित युवकांसाठी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र सुरू करणे 

८)रोजगार मेळावे घेणे. 

९)दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन घेणे 

१०)पारधी समाजाच्या व्यसनमुक्ती साठी मार्गदर्शन केंद्र सुरू करणे 

११)प्रत्येक गावाची नवीन कार्यकारणी 

निवड करून

संघटनात्मक बदल घडवणे.

  अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे तरी आदिवासी पारधी महासंघच्या(ऊत्तर महाराष्ट्र) पदाधिकाऱ्यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.


     जाहीर  आव्हान तालुका अध्यक्ष 

                 (गणेश चव्हाण )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध