Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
रेल्वे प्रशासन शेगाव रेल्वे स्थानकावर जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात - मोहन देशपांडे
रेल्वे प्रशासन शेगाव रेल्वे स्थानकावर जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात - मोहन देशपांडे
.......शेगाव रेल्वे स्थानकावर दिव्यांग व जेष्ठ प्रवाशांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाचा लोकार्पण
शेगाव:-प्रतिनिधी (उमेश राजगुरे ) देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व मध्यरेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन मधील मुंबई कलकत्ता लोहमार्गावर महत्त्वपूर्ण असे रेल्वे स्टेशन म्हणून आदर्श रेल्वे स्टेशन शेगाव येथील रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे
प्रशासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन शेगाव रेल्वे स्टेशनचे परिवहन निरीक्षक मोहन उर्फ एम के देशपांडे यांनी व्यक्त केले
शेगाव रेल्वे स्थानकावर दिव्यांग व जेष्ठ वृद्ध प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर घेऊन जाणे व प्लॅटफॉर्मच्या बाहेर आणण्यासाठी बॅटरीवर चालणारे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे त्या वाहनाचा लोकार्पण सोहळा गुरुवार 25 जुलै रोजी भुसावळ रेल्वे
डिव्हिजनचे चे रेल्वे सल्लागार सदस्य शेगाव नगरपालिकेचे नगरसेवक दिनेश भाऊ शिंदे भुसावळ येथील अंकुश पाटील शेगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेश चौधरी शेगाव प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व जय मातादी ग्रुप चे संस्थापक शेखर भाऊ नागपाल शेगाव बार असोसिएशनचे एडवोकेट पुरुषोत्तम डांगरा आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला होता यावेळी भुसावळ रेल्वे
सल्लागार मंडळाच्या सदस्य दिनेश शिंदे यांनी ही मार्गदर्शन केले . शेगाव रेल्वे स्थानकाचे प्रबंधक पीएम पुंडकर साहेब यांच्या प्रयत्नामुळे तसेच प्रवासी संघटना शेगाव आणि राजकीय पक्ष यांच्या सतत पाठपुराव्यामुळे शेगाव रेल्वे स्थानकाला ही बॅटरी चलित वाहन मिळाले आहे या
कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनातर्फे एम एल तुमडे साहेब एच के महाजन एम एम शेख आर पी एफ चे मीना साहेब यांच्यासह शेगाव प्रवासी संघटनेचे मयूर मूना पत्रकार दिनेश महाजन संतोष पिंगळे, पत्रकार उमेश राजगुरे , चेतन राठोड यांच्या सह मोठ्या संख्येने प्रवासी संघटनेचे सदस्य व रेल्वे यात्री गण उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा