Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
विज बिल अतिरिक्त दर वाढी विरोधात आमदार विनायकराव पाटील यांच्या निवासस्थाना समोर उलट्या हलग्या वाजवून जाहीर निदर्शने...
विज बिल अतिरिक्त दर वाढी विरोधात आमदार विनायकराव पाटील यांच्या निवासस्थाना समोर उलट्या हलग्या वाजवून जाहीर निदर्शने...
अहमदपूर.प्रतिनिधी गजानन अनंतवाळ आज दि 25 रोजी अहमदपूर चाकूर तालुक्यातील विज बिल अतिरिक्त दर वाढीच्या विरोधात आमदार विनायकराव पाटील यांच्या काळेगाव येथील निवासस्थाना समोर भारिप बहुजन महासंघ,वंचित बहुजन आघाडी,
एमआयएम च्या वतीने उलट्या हलग्या वाजवून जाहीर निदर्शने करून अतिरिक्त विज दर कमी करण्यासाठी स्थानिक आमदाराने विधानसभेत त्वरित प्रश्न
उपस्थित करून महावितरण कंपनी कडून सर्व सामान्य नागरिकांना न परवडणारे विज बिल देण्यात येत असून कंपनी कडून सर्व सामान्यांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. ही लूट त्वरित थांबवण्यात यावी
अन्यथा पुढील काळात या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला. यावेळी, ए आय एम आय एम चे लातुर जिल्हा युवा अध्यक्ष जीलानी मणियार,ए आय एम आय एम
अजमत पठाण अहमदपूर भारिप तालुका अध्यक्ष मनोज(मुन्ना) कांबळे , चाकूर तालुका अध्यक्ष मार्शल माने, तालुका महासचिव लखन गायकवाड, एम.बी वाघमारे,रंगनाथ वाघमारे,महमद
सय्यद,आशाताई कांबळे,रामेश्वर गवाले,धम्मपाल परतवाघ,सुनील कांबळे,अनिल कदम,प्रवीण कासादे,राजू मेकाले,आदित्य गुळवे,शंकर गडमे,समाधान गायकवाड,संगम कांबळे,मुरतुजा
दापकेवाले,शंकर माने,रोहित कांबळे,अरुण दांडगे,दयानंद वाघमारे,व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
-
बापू चव्हाण दिंडोरी क्रिशा फाऊंडेशन संचलित ज्ञानज्योती क्लासेस,किड्स टाऊन स्कूल आणि क्रिशा टेक्नो हबचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा