Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ जुलै, २०१९
भावेर जि.प शाळेत हात धुवा मोहिम
कुरखळी प्रतिनिधी( योगेश्वर मोरे )
शिरपुर तालुक्यातील भावेर येथील जि. प. शाळेत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र धुळे संलग्न स्व अण्णासो दरबारसिंग रामसिंग राजपूत प्रतिष्ठान भावेर तर्फे स्वच्छ भारत समर इंटरशीप फेज 2 अंतर्गत हात धुवा मोहीम प्रात्यक्षिक सराव वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यध्यापक श्रीनिवास साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व
स्वच्छतेच्या सवयी असाव्यात त्या अनुषंगाने प्रथम संस्थेचे अध्यक्ष भटेसिंग राजपूत, गिरीश गांगुळे, जगदीश कोळी, ज्ञानेश्वर धनगर यांनी स्वच्छता व त्याचे आपल्या आयुष्यातील महत्त्व विविध उदाहरणे देऊन मनोगातून समजवून सांगितले, त्यानंतर प्रत्यक्ष हात धुण्याचे प्रात्याक्षिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार
तळहात,नखे,हाताचा मागील भाग बोटे अश्या सात पायरी प्रमाणे विद्यार्थ्यांना कडून करून घेण्यात आले. यात हात किती वेळा व कसे धुवावे यांचे मार्गदर्शन केले. हात धुण्यासाठी साबण कसा व का वापरावा यांचे महत्व सांगण्यात आले. कार्यक्रमाचा सुरवातीला स्वच्छतेचे शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सरपंच सुदाम गुजर संस्थेचे सचिव मयूर राजपूत , दर्शना राजपूत, शरद राजपूत यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा