Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६

वणी पोलीस ठाण्यात मटक्याचा गुन्हा दाखल; सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड व पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे ॲक्शन मोडवर !


माधव खाबिया 
वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७:४० वाजता वणी पोलीस ठाणे हद्दीतील भनवड गावात बोऱवन जाणाऱ्या रोडलगत एका घराच्या आडोशाला मटका घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत आरोपींकडून मटका जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य तसेच रोख रक्कम असा एकूण सुमारे ३६८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पत्रकात नमूद आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी जयवंत रंगनाथ डंबाळे (वय २९ रा. भनवड, ता. दिंडोरी) आणि विष्णू रामदास भाये (वय २८, रा. वडाळी, ता. दिंडोरी) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मटका व्यावसायिकांवर पोलिसांचा वॉच
वणी परिसरात अवैध मटका व्यवसायाबाबत यापूर्वीही नागरिकांकडून तक्रारी होत असताना आता पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच कायम राहणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध