Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२६

कसबे वणी येथे पर्युषण महापर्वाचा सोत्साहात समारोप; बाल व युवा तपस्वींचा भव्य वरघोडा संपन्न.



​वणी : महेंद्र लोढा
पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात समारोप झाला. श्रावण वद १२ ते भाद्रपद शुद्ध ४ या कालावधीत संपन्न झालेल्या या पावन पर्वात संपूर्ण जैन समाज आराधना आणि धर्मरंगात न्हाऊन निघाला होता. पर्वाच्या सांगतेनिमित्त कठोर तपश्चर्या करणाऱ्या बाल व युवा तपस्वींचा ऐतिहासिक आणि नेत्रदीपक असा भव्य वरघोडा (शोभायात्रा) गावातून काढण्यात आला.
​या पर्वा दरम्यान गच्छस्थवीर प.पू. आचार्य भगवंत श्री ललितशेखर सूरीश्वरजी म.सा. आदि ठाणा ९ तसेच साध्वीजी भगवंत दीप्तीरत्ना श्रीजी म.सा. आदि ठाणा ५ यांची पावन निशा आणि सानिध्य वणी नगरीला लाभले. पर्वाच्या प्रारंभी पहिले तीन दिवस अष्टान्हिका प्रवचन, पुढील चार दिवस कल्पसूत्र ग्रंथ वाचन आणि आठव्या दिवशी बारसासूत्र ग्रंथाचे वाचन झाले. आठवा दिवस म्हणजेच संवत्सरी महापर्व मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
​तपस्वींची अलौकिक साधना:
पर्युषण काळात बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी कठीण तपश्चर्या पूर्ण केली. यामध्ये प्रामुख्याने खालील तपस्वींचा समावेश आहे:
​लव्या पारख
​परी बोथरा
​नेत्रा बोथरा
​सौम्या बोथरा
​रिदिमा पारख
​प्रीत सिसोदिया
​ह्रीदम पारख
​दीक्षिता समदडीया
​मेघा समदडीया
​विरेशा संचेती
​युगम पारख
​गाथा पारख
​देवांश समदडीया
​हार्दिक समदडीया
​खुशी बोथरा
​विरम बोथरा
​सरलाबाई इंदरचंदजी बोरा
​वैभव इंदरचंदजी बोरा
​वाजत-गाजत निघाली भव्य शोभायात्रा:
सर्व तपस्वींच्या बहुमानासाठी वणी श्वेतांबर मूर्तीपूजक संघातर्फे भव्य वरघोड्याचे आयोजन करण्यात आले होते. गावातील मुख्य जैन मंदिरापासून ढोल-ताशांचा गजर, आकर्षक रथ, सजवलेल्या विंटेज कार, पालखी आणि जयघोषाच्या निनादात या मिरवणुकीची सुरुवात झाली. उघड्या रथात आणि वाहनांमध्ये आरूढ झालेल्या बाल तपस्वींवर ग्रामस्थांनी अक्षता व फुलांची उधळण केली. समाजातील अबालवृद्ध पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
​या वरघोड्याची सांगता शंखेश्वर पार्श्वभ्युदय मंदिरावर झाली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना प.पू. आचार्य भगवंत श्री ललितशेखर सूरीश्वरजी म.सा. यांनी तपश्चर्येचे महत्त्व विशद करत सर्व तपस्वी बालकांना आशीर्वाद दिले आणि त्यांच्या दृढ संकल्पाचे कौतुक केले.
​वणी श्वेतांबर मूर्तीपूजक संघाच्या चोख नियोजनामुळे हे आठ दिवस अत्यंत खेळीमेळीच्या आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. गुरुदेवांच्या प्रवचनानंतर मंगलमय वातावरणात या महापर्वाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध