Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

चोपडा नगरपालिकेने 25 % घरपट्टी वाढवल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा पालिकेवर धडक मोर्चा,,,,






चोपडा (प्रतिनिधी) विनोद निकम
चोपडा नगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर आकारणी या वर्षा पासून 25 % वाढीव घरपट्टी पालिकेच्या जनरल मीटिंग मध्ये शासन निर्णयया नुसार विषय घेऊन बहुमताने वाढवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता, तरी या विषयाला विरोध करत डॉ, चंद्रकांत बारेला मित्र परिवार व 

शहरातील नागरिकांच्या तर्फे आज दुपारी बारा वाजता शहरातील विविध भागातून मोर्चा काढून नगरपालिका कार्यालयात धडकला ,मोर्चेकरांनी मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी अविनाश गांगोर्डे यांना देऊन मागण्या मान्य होत नाही तो प्रयत्न आम्ही सर्व नागरिक येथून जाणार नाही  असे मागणीवर ठाम मत व्यक्त केले आहे, यावेळी डॉ ,चंद्रकांत बारेला,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे, प्रा,शरद पाटील यांनी मार्गदर्शन केले ,निवेदनावर डॉ, चंद्रकांत बारेला, प्रा, शरद पाटील, अर्जुन चोधरी, निलेश जाधव,दिपक वानखेडे, ईश्वर 

सूर्यवंशी, मंगल बडगुजर, अमोल राजपूत, गजानन पाटील, जियोद्दीन काजी,शकील मन्यार, फिरोज मन्यार, विवेक गुजर ,यांच्या सह्या आहेत,यावेळी नगराध्यक्षा सौ,मनीषा चॊधरी,गटनेते जीवन चॊधरी,यांच्या सह शहर विकास आघाडी चे काही नगरसेवक व पालिकेतील सर्व कर्मचारी हजर होते,यावेळी मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध