Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२६

प्रदूषित पाण्याची तात्काळ तपासणी करावी वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन - प्रेम गांगुर्डे.


संदीप अवधूत  

दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी नमुने तपासून कायदेशीर कारवाई करणे बाबत प्रेम गांगुर्डे यांनी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडा यांना निवेदन दिले असून त्यात नमूद असे कि लखमापूर गावातील ग्रामपंचायत असलेली दालमिया कंपनी शेजारील पिण्याच्या पाण्याची विहीर असून सदरील विहिरीत दालमिया कंपनीकडून बाहेर सोडण्यात येणारे सांडपाणी/प्रदूषित पाणी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत मिसळत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.सदर विहिरीतील पाणी परिसरातील नागरिकांकडून पिण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी करण्यात येत आहे. कंपनीकडून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे विहिरीतील पाण्याची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
ही बाब सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून, संबंधित यंत्रणेने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तातडीने पंचनामा व पाहणी करावी. तसेच विहिरीचे पाणी तपासून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच खालीलप्रमाणे तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशीही विनंती करण्यात आली
संबंधित कंपनीच्या परिसराची व सांडपाणी सोडण्याच्या ठिकाणाची तात्काळ पाहणी करण्यात यावी.
कंपनीचे सांडपाणी तसेच पिण्याच्या विहिरीतील पाण्याचे अधिकृत पद्धतीने नमुने घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी.
पाण्यातील रासायनिक, जैविक व इतर प्रदूषक घटकांची तपासणी करण्यात यावी.
कंपनीकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (ETP/STP) असल्यास त्याची कार्यक्षमता व नोंदी तपासण्यात याव्यात.
कंपनीकडून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित कंपनीविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सदर विहिरीचे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही, याबाबत आरोग्य विभागामार्फत तपासणी करून अहवाल देण्यात यावा.
प्रदूषणाचा स्रोत निश्चित करून तो तात्काळ बंद करण्यासाठी आवश्यक आदेश देण्यात यावेत.
नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी.
केलेल्या कारवाईचा व पाणी तपासणी अहवालाचा लेखी तपशील निवेदनकर्त्यास देण्यात यावा.
सदर प्रकरणात कोणतीही दुर्घटना किंवा नागरिकांच्या आरोग्याची हानी होण्याची वाट न पाहता तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाणी नमुने घेऊन त्याची तपासणी करावी व दोष आढळल्यास संबंधित कंपनीवर नियमानुसार कठोर कारवाई करावी.
अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात येईल, असे निवेदनात नमूद आहे संबंधित निवेदन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रतापराव देशमुख यांना दिले असून त्यावर डॉ प्रतबराव बळवंतराव देशमुख यांना दिले असून त्यावर 
 प्रेम गांगुर्डे भारती जनता पार्टी, ह्यूमन राइट्स कन्सिल ऑफ इंडिया..
    निखल देशमुख, सोमनाथ बदादे, संतोष सूर्यवशी,संदीप मेसट व इतर यांच्या सह्या आहेत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध