Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

कलम_370 हटविण्याच्या निर्णयानंतर नळदुर्ग शहरात जल्लोष








प्रतिनिधी (विशाल डुकरे ) भारताच्या अखंडतेसाठी देशाचे कणखर नेतृत्व  पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमितभाई शहा यांनी भारताला स्वातंत्र्य 

मिळाल्यापासूनचा जम्मू-काश्मीर अन संपूर्ण भारत देशासाठी महत्वपूर्ण असलेला जम्मू-काश्मीर मधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेत त्याची शिफारस राज्यसभेत करताच शहरातील चावडी चौक, शास्त्री चौक येथे नळदुर्ग शहर भाजप व भारतीय जनता युवा मोर्चा वतीने मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत 

फटाक्याची आतिषबाजी करत तसेच पेढे वाटून करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष धिमाजी घुगे, तालुक्याचे प्रसिद्धी प्रमुख सुधीर पोतदार, गोपाळ देशपांडे, सरचिटणीस विशाल डुकरे, सागर हजारे, उमेश नाईक, शंकर वाघमारे, 

भीमाशंकर बताले, बबन चौधरी, गोटू पुदाले, विजू शिंदे, कमलेश पोतदार, सचिन हत्ते, जमन ठाकूर, गोवर्धन घोडके, किरण दुस्सा सह भाजप कार्यकर्ते व देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध