Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

रावेर यावल विधान सभा मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या संदर्भात दि.05 ऑगस्ट रोजी सावदा रेस्ट हॉउस येथे






प्रतिनिधी अजीज शेख रावेर तालुक्यातील सावदा येथील

वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष भारिप बहुजन महासंघाचे जि. अध्यक्ष हे होते. या बैठकीत 

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना युवकचे जि. अध्यक्ष बाळाभाऊ पावार यांनी पक्षाचे नियम व अटी पक्षाचे धैय्य धोरण व वंचित समाजातील लोकांना पक्षामधे सामावून घेण्याचे सांगितले. रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांनी बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांचा कार्यकर्ता कसा असला पाहिजे तर कार्यकर्ता हा प्रमाणिक व 

स्वाभिमानी असला पाहिजे. आज तरुणांची जवाबदारी आहे कि आपण नेता ओळखला पाहिजे आणि स्वाभिमानी नेता कोणी असेल तर ते बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर आहे. स्वयं घोषित नेत्यांचे दुकाने आता बंद पडले आहे. म्हणून तरुण मुलांनी याच्या त्याच्या मागे न जाता वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार  करने गरजेचे आहे. असे बाळु शिरतुरे म्हणाले या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य तिन उमेदवारांनी आपण कश्या पद्धतीने जर वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवू याची 

सविस्तर माहिती दिली. त्यात फैजपुरचे भरिपचे तालुका अध्यक्ष मनोज कापडे, सावदयाची  शमिनबि, निभोरा येथिल विवेक ठाकरे , रावेर यावल विधानसभा मतदार संघामधे धुळे येथे 11 संभाव्य उमेदवारांनी आपल्या मुलाखति दिल्या आहे. अध्यक्षीय भाषनात विनोद भाऊ सोनवणे यांनी दुसऱ्या पक्षात व संघटनेत काम करणार्यांनी आम्हाला सूचना देऊ नये. आधी वंचित बहुजन आघाडी मधे प्रवेश करा . मंग आम्हाला सुचना सांगा. इतर पक्षामधे व संघटनेमधे काम करणार्यांनी मधेच लुळबुळ करू नये. बाळासाहेब 

प्रकाश आंबेडकरांचा आदेश असेल तो आम्हा सर्वांना मान्य असणार आहे. असे विनोदभाऊ सोनवणे अध्यक्षीय भाषनात म्हणाले. या बैठकीत जिल्हा नेते सुदामभाऊ भाऊ सोनवणे, भुसावल ता. अध्यक्ष 

रूपेशभाऊ साळुंके , रफिक बैग , राहुल गाढे , उमेश सवर्णे , युवक ता. अध्यक्ष सचिन बाऱ्हे , अर्जुन वाघ , पिंटु तायडे. रावेर यावल तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तित होते. मीटिंग संपल्या नंतर वंचित बहुजन आघाडिमधे यावल तालुक्यातील 50 ते 55 कार्यकर्त्यांनी जाहिर प्रवेश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध