Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
अमळनेर धुळे सीमेवरून वाहणाऱ्या पांझरा नदीला महापूर, बोदर्डे ग्रा.पं.ला पाण्याचा वेढा; ५0 कुटुंबांचे स्थलांतर
अमळनेर धुळे सीमेवरून वाहणाऱ्या पांझरा नदीला महापूर, बोदर्डे ग्रा.पं.ला पाण्याचा वेढा; ५0 कुटुंबांचे स्थलांतर
अमळनेर प्रतिनिधी ( शिवाजी पारधी ) अक्कलपाड़ा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पांझरा नदीच्या पाण्याने अमळनेर तालुक्यातील मुडी ,बोर्दडे येथील गाव दरवाजाच्या तीन पाय-या बडाल्या व शॉपिंग
कॉम्प्लेक्समध्ये पाणी घुसले. तसेच बोदडे ग्रामपंचायतीला पाण्याने वेढा घातला.
ग्रामपंचायतीचे काही महत्वाचे कागदपत्रे पाण्यात भिजले आहेत, रविवारी रात्री ९.३० वाजता ४० हजार क्युसेक पाणी
सोडले. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. मुडी-कळंबू रस्ता
पाण्याने बुडाला. बोदडे येथील ५० आदिवासी कुटुंबे जि.प. शाळेत स्थलांतरित केले. तसेच मुडी गावाचे बस स्टँड वरचे शॉपिंग मध्ये पाणी घुसल्याने काहींचे नुकसान झाले आहे.
अक्कलपाडा धरणातून रविवारी रात्री पांझरा नदी पात्रात २२,०००
क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
हा पाण्याच विसर्ग ४०,००० क्यूसेस पर्यंत जाणार
आहे. त्यामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहत
आहे. .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा