Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

पातोंडा येथे सालाबादा प्रमाणे वृक्षरोपन





प्रतिनिधी( शिवाजी पारधी )पातोंडा परिसर विकास मंच,पातोंडा,ता.अमळनेर,जि.जळगाव,म्हणजे एक अद्वितीय,सामाजिक,सांस्कृतिक ,शैक्षणिक ,जलसंधारण,मनसंधारण, वृक्ष-लागवड,संवर्धन तसेच मराठी माध्यमातूनच  शिक्षण प्रोत्साहन चळवळ आणी एक गाव एक गणपती असं एकाच वेळेस सर्वस्तरावर अत्यंत वेगाने काम करणारी अराजकिय अद्वैत चळवळ.




आजचा लेखाजोखा फक्त वृक्ष-लागवड आणि संवर्धन अभियान ...




पातोंडा परिसर विकास मंचची स्थापना दि.१मे २०१५या मंगलमय दिनी म्हणजे महाराष्ट्रराज्य स्थापना आणी कामगार दिन या शुभमुहुर्तावर झाली.
काही दिवसातच तिचे नोंदणीकृत संस्थेत रुपांतर झाले.

५मे२०१५ला "युवाजागर अभ्यासिका" सूरु करुन कार्याला सूरुवात केली.
५जुलै २०१५ला "युवाजागर अभ्यासिका गावार्पण सोहळा" हे निमित्त साधून त्याच दिवशी "पातोंडा परिसर विकास मंचने,वृक्षारोपण सोहळा व स्वच्छता अभियान हे पर्यावरण पूरक कार्यक्रमांना सूरुवात केली.तसेच ह्या वर्षी 

नालाखोलीकरणाचे पूर्ण काम करण्यात आले, परिसरात म्हणजे मथगव्हान येथे अभ्यासिका चालू करण्यात आली, दरवर्षी परिसरात 5 वि ते 12 वि  च्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती होण्यासाठी सामान्यज्ञान परीक्षा घयेण्यात येऊन दरवर्षी ही परीक्षेला 1000 ते 1200 विध्यार्थी बसतात. 

पातोंडा परिसर विकास मंचार्तगत भरपूर अभियाने अव्याहत चालू आहेत आतापर्यंत व पुढेही.

वृक्षारोपण आणी संवर्धन हा आजचा प्रमुख विषय आहे.

५जुलै२०१५रोजी साधारण ५००वृक्षरोपांची,मराठी प्राथमिक शाळा,श्री ग्रामदेवता मंदिर परिसर,चोपडा रस्ता , स्मशानभूमी परिसर,गावातील विशेष चौक जागा,एस.टी.स्टँड या परिसरात स्थानिक मावळ्यांना रोप दत्तक योजनेखाली लावली.आतापर्यंत त्यांतील बहुतांश रोपांची छान वाढ होत चाललेली आहे.मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन 

२जुलै२०१६ला ट्री-गार्डसह २००झाडांची लागवड केली.सन २०१७च्या जुलै मध्ये जवळजवळ गावठाण जागेत ३०० अस्ट्रोलयीन साग व विविध झाडे लावलीत त्यांतील काही जगलीत काही वाया गेलीत पण विविध प्रयोग आणि यत्न सोडले नाहीत.गेल्यावर्षी म्हणजे १५जुलै२०१८ला आम्ही "पातोंडा परिसर  विकास मंच आणि ग्रामपंचायत पातोँडा" यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजित साकारन्यात आलेली ८०गुंठे जागेतील ध्यानकेंद्रात ओपन जिम उभारण्यात येणार आहे , अभ्यासिका व वाल कंपांऊंड देऊन साधारण१५०निंबाची झाडे वाल धरून लावली व सगळीच्या सगळी जगवली आता ती वर्षाची झालेली आहेत .भर उन्हाळ्यात आम्ही त्यांना ठिबक व टँकरने पाणी देत होतो.

"यंदाचा वृक्ष-रोपण सोहळा आगळा वेगळा सगळ्यांना हवाहवा वाटणारा"
आमच्या गावचे सुपुत्र पोलीस खात्यात मोठ्या हुद्द्यावर असलेले प्रिय श्रीमान बापुसाहेब कन्हैय्यालाल पन्नालाल थोरात यांनी आपले लहान बंधू ,कै.महेश पन्नालाल थोरात यांच्या पुण्यस्मरणार्थ..जी व्यक्ती/संस्था/मंडळ  ३वर्षात २०झाडे 

जगवून,वाढवून दाखवेल त्यांस रु.११०००/-चे रोख पारितोषिक जाहीर केलेले आहे,मग यशस्वी स्पर्धक कितीही असोत.
दुसरे वैशिष्ट्य विकास मंचने रोप वाटप करतांना प्रत्येक रोप स्विकारणार्यांकडून वृक्ष-वाढ व संरक्षण हमी पत्र लिहून घ्यायचे ठरविलेले आहे व ते सूरु आहे.
असा हा आमचा सन २०१५पासून वृक्ष लागवड अभियानाचा ५वा अध्याय[पेपर]आहे.

पूर्वीच्या सर्व उत्तर-पत्रिका आम्ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या आहेत.
यंदा मात्र विशेष योग्यतेकडे वाटचाल..
कारण यंदाचं उद्दीष्ठ ५०००वृक्ष-लागवड व संवर्धन करणे आहे.श्री प्रशांत दगडू पवार यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष उपलब्ध करून दिले तसेच श्री सुनील अमृत पाटील ग.स. संचालक यांनी ट्री गार्ड दिलेत.

दिनांक १४/७/२०१९रोजी वृक्ष -दिंडी गावातील भजनी मंडळाच्या सहकार्याने काढून जनजागृती केली आणी आमचे सल्लागार /प्रेरणास्थान मा.प्रा.श्री मगन झिपरु सुर्यवंशी यांच्या हस्ते ६००रोपांचे वाटप करण्यात आले.

आज दि.३१/७/२०१९रोजी मान्यवरांचे  हस्ते १०००रोपांचे वाटप मान्यवरांचे हस्ते  करण्यात आले.

आमच्याकडे अजून ३४००रोपं आहेत त्यांत निंब,चिंच,देवकापूस,गुलमोहर,खैर ,बांबू यांचा समावेश आहे.त्यांचेही लवकरच वाटप होईल.

आमच्या चळवळीचे आजचे वैशिष्ट्ये म्हणजे सामांन्य ग्रामस्थ,विद्यार्थी ,जेष्ठ नागरिक ते चूल सांभाळणारी सन्माननीय महिला देखील या हिरव्या अभियानात हिरहिरीने सहभागी होतांना दिसत आहे.
अशा तर्हेने पाचूसम हिरवे स्वप्न बघणारे व सत्यात उतरविणारे गाव सार्या महाराष्ट्राला दिसल्याशीवाय राहणार नाही.

पातोंडा परिसर विकास मंचचा हा जगन्नाथी रथ पुढे नेण्यास असंख्य हात प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष आहेत,फक्त या  ठिकाणी प्रातिनिधीक व नोकरीव्यवासायानिमित्त बाहेर गावी राहणाऱ्यांची नोद करतो.मा.प्रा.मगन सुर्यवशी डोँबिवली , मा.पोलीस अधिकारी 

पी.एल.संदांशिव,बेलापूर,परिवहन महामंडळ अधिकारी श्री ज्ञानेश्वर बोरसे ऐरोली,पोलीस अधिकारी श्री कन्हैय्यालाल थोरात खारघर ,नवीमुंबई.पातोँडा परिसर विकास मंचची संकल्पना उदयास आणणारे , जि.प.वित्तलेखाधिकारी श्री कपिल पवार,जळगावआणी सर्व स्थानिक मावळे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध