Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
चार भिंतीच्या आतील गुन्हा म्हणजे सायबर क्राईम-साहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे यांचे प्रतिपादन
चार भिंतीच्या आतील गुन्हा म्हणजे सायबर क्राईम-साहाय्यक पोलीस निरीक्षक वानखेडे यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी(राजु तडवी) दि.३१/७/२०१९ रोजी धनाजी नाना महाविद्यालय , फैजपूर येथे पोलीस स्टेशन ,फैजपूर व विद्यार्थी कल्याण विभागातर्फे 'सायबर क्राईम'या विषयावर मार्गदर्शनाप्रसंगी प्रसंगी प्रमुख अतिथी श्री.प्रकाश वानखेडे पोलीस साहाय्यक निरीक्षक ,फैजपूर यांनी
प्रतिपादन केले.त्याचबरोबर सायबर गुन्हाचे स्वरुप तो कसा व का घडतो , अशा प्रसंगी कोणती काळजी घ्यावी,त्या संदर्भातील कायदे सांगून स्वताचा बचाव कसा करावा याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.तसेच प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थांच्या सूरक्षेसाठी पोलीसकाका व पोलीसदीदी मदतीला कार्यरत राहणार आहेत .धनाजी नाना महाविद्यालयात श्री.ज्ञानेश्वर पवार -पोलीसकाका व मदिना तडवी यांची पोलिसदीदी पदी कार्य समर्थ पणे सांभाळतील. अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर चौधरी होते. अध्यक्षीय समारोपात त्यांनी विद्यार्थांनी महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घ्यावा पण आपल्या हातून कुणाचे नुकसान होणार नाही याचेही भान ठेवावे असे आवाहन केले. विद्यार्थी विकास प्रमुख डॉ.गोपाळ कोल्हे यांनी प्रास्तविकातून कार्यक्रमाचा आयोजनासंदर्भातील भूमिका विषद केली.प्रा.डाॕ .सिंधू भंगाळे,प्रा.डाॅ .नितिन चौधरी ,डाॅ .राजेंद्र ठाकरे ,डाॅ
.दीपक सूर्यवंशी ,श्री .मोहन लोखंडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र राजपूत यांनी केले आणि आभार प्रा. डॉ.कल्पना पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संखेने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा