औरंगाबाद/मुंबई प्रतिनिधी:भोई, कहार तत्सम जातींना अ.जाती/जमाती या प्रवर्गात आरक्षण मिळावे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व त्यासंदर्भात या जातींची बाजू शासनाच्या निदर्शनास आणण्यासाठी पुढील रणनीती ठरविण्यासाठी दिनांक १८ ऑ
गस्ट,२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता बेगमपुरा औरंगाबाद येथे बैठकीचे नियोजन करण्यात आले होते सदर बैठकीत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त खालील प्रमाणे पाठवित आहोत
_*१. समाज आरक्षण:-*_
_समाज आरक्षणाबाबत सर्वश्री डॉक्टर अरविंद केशवराव तुंबारें ॲड. शंकर वानखेडे अशोक गीते (पत्रकार) अशोक लकारे चरण कुंठे लक्ष्मण परसैय्या जयसिंग गहिरे पांडुरंग बरे डॉक्टर दिलीप बिरुटे गोपीचंद गव्हाणे बाळू लहिरे राम परसैय्या पन्नालाल बिरुटे प्रा.काकासाहेब रामभाऊ लकारेसर विनोद नेमाडे हिरालाल हरिश्चंद्र बिरुटे व इतर समाजबांधवांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये वरील समाज बांधवांनी
प्रामुख्यानी ही बाब निदर्शनास आणली की, भोई व तत्समजातींना इतर 154 जातींसह केवळ 2.5 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. सुरुवातीला भज-ब या प्रवर्गात केवळ 38 जातींचा समावेश होता मात्र त्या वाढत जाऊन आज सुमारे 154 जाती झालेल्या असुन आरक्षणामध्ये मात्र वाढ झालेली नाही. आलेल्या जाती ज्या भज-ब या जातीप्रवर्गात आहेत त्यासाठी
सुरुवातीला विजा/भज हा प्रवर्ग होता आणि त्या प्रवर्गातील इतर जातींबरोबर ज्यावेळी आपण दिल्ली पर्यंत मोर्चे नेले त्या जातीच्या नेत्यांनी सोईस्कररित्या त्यांची एकच जात वेगळी घेऊन त्यासाठी स्वतंत्र आरक्षण घेतले आहे मात्र आपण आज ही 154 जातींच्या आरक्षणासाठी दिलेल्या 2.5 टक्के आरक्षणामध्ये आहोत. प्रत्यक्षात भज-ब मधील भोई व इतर ३७ तत्सम जमातीजाती या इतर समाजापेक्षा खुप मागास असुन त्या आदिवासी जिवन जगत आहेत आजही नदीच्या किनारी झोपडी तंबु अथवा राहूटी टाकून हा समाज आपला उदरनिर्वाह करत असल्याने या समाजासाठी अनुसुचित जाती/जमातींचे फायदे मिळणे आवश्यक असल्याने ही चळवळ चालू करण्यात आली असुन यामध्ये सर्व
समाजातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाचे लक्ष आपल्या कडे वेधण्यात यावे आणि आपल्या मागण्या मान्य करण्यास शासनास भाग पाडावे._
_*२. आंदोलन रणनीती ठिकाण, तारीख:-
_वरीलप्रमाणे आरक्षणाची मागणी करतांना धरणे आंदोलन करावे की मोर्चा काढावा ही बाब चर्चेत आली. त्यावर धरणे आंदोलना करता मुकमोर्चा काढुन धरणे आंदोलनास एकमताने ठरले मुक मोर्चा बेगमपुरापासून काढून विभागीय आयुक्तालय दिल्ली गेट,औरंगाबाद येथे जाऊन विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरले. निवेदन देण्यापूर्वी *भोई कहार धीवर ढिवर केवट... तत्सम जमाती आरक्षण समन्वय समिती,महाराष्ट्रराज्य* या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील सर्व
सामाजिकसंघटना,सामाजिकट्रस्ट, सामाजिकप्रतिष्ठान, सामाजिकमंडळ सामाजिक संघ,दल,संस्था यांच्या रजिस्ट्रेशन नंबरसह अध्यक्ष यांच्या नावाने निवेदन देण्याचे एकमताने ठरले तत्पूर्वी मोर्चा काढून जे निवेदन द्यायचे आहे ते निवेदन सार्वजनिक करावे व त्याच नियोजनाची प्रत प्रत्येक तालूका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तहसिलदार/ जिल्हाधिकारी यांना देण्यात यावे तसेच तेच निवेदन मोर्चाच्या दिवशी औरंगाबाद येथे हजारोंच्या संख्येने मुकमोर्चा काढून विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांना देण्यात यावे यावर ही एकमत झाले. मोर्चाची तारीख सध्या १४ सप्टेंबर २०१९ ठरलेली आहे. मात्र तोपर्यंत किंवा त्यानंतर चारदोन दिवसात विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागु शकते त्यामुळे शक्यतो मोर्चाची तारीख अलीकडे घ्यावी अशी बाब चर्चेत आली परंतु त्यापूर्वी गणेशोत्सव असल्यामुळे मोर्चाची परवानगी मिळेल की नाही यामुळे सध्या तरी हीच तारीख ठेवावी असे ठरले तारीख ही अलीकडे घेण्यासाठी प्रयत्न करावे असे ठरल्याने ही जबाबदारी औरंगाबाद मधील समाज बांधवांनी उचलली आहे त्यानुसार औरंगाबाद येथील समाज बांधवांनी सांगितले की, आम्ही भोई मल्लाव व इतर समाज बांधवांशी चर्चा करतो त्यांना विश्वासात आणि सोबत घेऊन विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन आम्ही फक्त मुक मोर्चा काढणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला गणेशोत्सव काळात परवानगी देण्यात यावी अशी विनंती करतो. तशी परवानगी मिळालीच तर तशी तारीख जाहीर करु असे सांगितल्याने मोर्चाची तारीख बदलण्याची शक्यता असुन ती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही ठरले.
_*३. कृतिसमिती निवड:-*_
_प्रत्येक जिल्ह्यातून(३६जिल्हे विभाग) कमीत कमी पाच प्रतिनिधी, प्रत्येक भोई कहार व तत्सम जमातीमधून निवडण्याचे ठरले तसेच सर्वश्री चरण कूंठे, डॉ. दिलीप बिरुटे,बाळू लहीरे ॲड. वानखेडे, प्रेमचंद गहिरे यांच्या समवेत मोर्चासाठी विविध परवानगी काढण्यासाठी तसेच नियोजन करण्यासाठी एक समिती ही औरंगाबाद येथे गठित करण्याचे ठरले._
_*४ . आंदोलन प्रचार, प्रसार:-*_ _प्रचारासाठी लागणारे हॅण्ड बिल, pamplet, बॅनर्स, झेंडे तयार करण्याची जबाबदारी मुंबई समाजबांधवांनी घेतलेली आहे. आंदोलनाचा प्रचार आणि प्रसार प्रत्येकाने प्रत्येक गांव पासून ते जिल्ह्यापर्यंत करण्याचे ठरले यासाठी मीडियाची मदत सुद्धा घेण्याचे ठरले._
_*५. आंदोलन आर्थिक बळ:-*_
_या आंदोलनासाठी समाजाचे सरकारी, निमसरकारी नोकरदार शिक्षक व्यावसायिक मंत्रालयातील कर्मचारी समाजसेवक यांच्याकडून आर्थिक मदत मिळविण्याचे ठरले तसेच राज्यातुन ज्यांना समाजघटक म्हणून आपल्या समाजहक्कासाठी आपला सहभाग म्हणून आपले योगदान द्यावे मोर्चाला येण्यासाठी प्रत्येक गावातून समाजबांधवांनी आपली वर्गणी करून वाहतुकीसाठी गाडी करण्याचे ठरवावे तसेच ज्यांच्याकडे twowheelers, fourwheelers आहेत त्यांनी त्यांचा वापर इतर ही समाजघटक यांच्यासाठी करावा मोर्चासाठी प्रत्येकाने कमीत कमी पाच जण आणण्याचे ठरवावे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व समाजबांधवांना करण्यात आले._
_*संपुर्ण उपस्थितांचे आभार मानून समाज हक्क आरक्षण बैठक संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले.*_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा