Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुभाष भामरे, किरीट सोमय्या, प्रवीण पोटे पाटील, योगेश गोगावले, अशोक कांडलकर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली नियुक्ती
भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुभाष भामरे, किरीट सोमय्या, प्रवीण पोटे पाटील, योगेश गोगावले, अशोक कांडलकर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली नियुक्ती
मुंबई,प्रतिनिधी 19 ऑगस्ट 2019
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), मा. योगेश गोगावले (पुणे) व अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा, प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे.
मा. प्रदेशाध्यक्षांनी काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या असून त्या पुढीलप्रमाणे – पुणे शहराध्यक्ष आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी ना. माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमांच्या
संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह मा. केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त प्रवक्ते पुढीलप्रमाणे – मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे व वैयक्तिक कारणांमुळे पुढील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे – प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील व रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर व व्यापारी आघाडी दिलीप कंदकुर्ते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा