Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिरपूर येथील निवड जिल्हाअध्यक्ष यशवंत निकवाडे तर शहराध्यक्षपदी संजय बागले





शिरपूर :(प्रतिनिधी) – नाशिक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय मानवाधिकार व सामाजिक न्याय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत शिरपूर येथील प्रख्यात सामाजिक व मानवाधिकार कार्यकर्ते सुभाष सुकलाल भोई यांची एकमताने उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी स्तुत्य निवड करण्यात आली. 

त्यांच्यावर धुळे, जळगांव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच धुळे जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व सुविख्यात लेखक, कवि, विचारवंत यशवंत गोविंदा निकवाडे यांची तर शिरपूर शहराध्यक्षपदी अमोद्याचे तरुण सामाजिक कार्यकर्ते सागर संजय बागले यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णकुमार पांडे, प्रदेश उपाध्यक्ष गोपाल के.मारवाडी, प्रदेश महासचिव जयकुमार दळवी हे उपस्थित होते. तसेच संघटनेच्या महिला विंगच्या सौ.माधुरी गुजराथी, कदमताई यांचेसह बुलढाण्याचे अमोल हरणे, औरंगाबाद येथील सय्यद लियाकत अली, जळगांवचे मुनीरभाई तडवी व जालना, चंद्रपुर , बुलढाणा, शेगांव, अकोला, नागपूर, नाशिक येथील 

पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने याबैठकीला उपस्थित होते. कृष्णकुमार पांडे यांच्याहस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. संघटनेच्या माध्यमातून मानव तस्करी, अवैध सावकारी, बालमजूरी, महिला उत्पीडन, बँकांची अवैध वसुली व भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणून प्रशासनास कारवाई करण्यास भाग पाडणे. हे उद्दीष्ट सर्वांनी पार पाडावे असे

ठरले.

संपूर्ण राज्यात लवकरच प्रदेश कार्यकारिणीचा दौरा असून प्रत्येक जिल्हा , तालुका व शहरांसाठी संपर्क कार्यालय उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणांत सर्व उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महासचिव जयकुमार दळवी यांनी तर आभार प्रदर्शन तडवी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध