Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९
श्रावण सोमवार निमित्त हरेश्वर मंदिरात जगदीशभाऊ मित्र मंडळातर्फे दूध वाटप
चोपडा प्रतिनिधी विनोद निकम शहरातील जूना शिरपुर रोड वरील पुरातन व सम्पूर्ण चोपडा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र हरेश्वर मंदिरात आज श्रावण मासाचा शेवटचा सोमवार या पवित्र दिनी चोपडा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार
जगदीशभाऊ वळवी मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आज दिनांक 26 रोजी सकाळी 10 वाजे पासून काजू,बदाम, केशरयुक्त दूध प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले ,जगदीशभाऊ वळवी हे श्री शंकराचे व महादेवाचे भक्त आहेत आपल्या व्यस्त दिनस्चर्येतून कुठेही असो,चोपडयात अथवा बाहेर गावी किंवा बाहेर देशात सोमवार आला म्हणजे आधीे महादेव मंदिरात नतमस्तक होणार मग आपल्या दररोजच्या व्यवहाराला सुरुवात करणार अशी अफाट श्रद्धा असल्याने आज श्रावण मासाचा शेवटचा सोमवार म्हणून आज रोजी मा आ जगदीश भाऊ व मित्र परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना दुध
वाटपाचा एक चांगला कार्यक्रम करण्यात आला .यात विशेष म्हणजे मा आ जगदीश भाऊ वळवी यांचे चिरंजीव चेतन वळवी यांनी स्वतः सकाळ पासून दूध तयार करण्यासाठी आपल्या मित्र मंडळासह परिश्रम घेतले यावेळी हजारो भाविकांनी दूध प्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी किरण मोरे,नाना देसले,प्रवीण पाटील, वराड येथील माजी सरपंच सुनील महाजन,पत्रकार शाम जाधव आदी हजर होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा