Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

*भटक्यांना साक्षर करणारी "पालावरची शाळा" ही मनाला समाधान देणारी संकल्पना*





नळदुर्ग प्रतिनिधी विशाल डुकरे  आरंभ ब. सामाजिक संस्थेचे सोशल मिडिया प्रमुख सुरज आवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नळदुर्ग शहरातील मरगम्मा वस्तीवरील पालावरची शाळा येथे आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करण्यात आले.

शासन जिथे कमी पडते तिथे पालावरच्या शाळेचा जन्म होतो. भटक्या विमुक्त या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे प्रगत व वंचित समाजातील दरी कमी करणे त्यांच्या वस्तीवर जाऊन शिक्षण देत त्यांना साक्षर बनवणे ही पालावरच्या शाळेची संकल्पना आहे, ही संकल्पना मनाला खूप समाधान देणारी आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ज्यामध्ये शिक्षणाचा पाया रचणारी पाटी आणि पेन्सील देऊन त्यांना शिक्षणाची आवड निर्माण करणे हा आरंभचा प्रयत्न होता, यावेळी या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी आरंभ सामाजिक संस्थेच्या वतीने चालू केलेल्या हरित नळदुर्ग या संकल्पाअंतर्गत "एक वाढदिवस एक झाड" हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्यामाध्यमातून सूरज आवटे व मंगेश महाबोले यांचा शुभेच्छारुपी सत्कार वृक्ष देऊन केला व पालावरच्या शाळेवर याचे वृक्षारोपण देखील करण्यात आले. येथील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शिक्षणासाठी आर्थिक किंवा इतर अडचणी आल्यास संस्थेच्या वतीने मदत करण्याचे वचन अभिप्रायाच्या माध्यमातुन देण्यात आले यावेळी पालावरच्या शाळेच्या गटप्रमुख मिराताई मोटे, आरंभ संस्थेचे उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, सोशल मीडिया प्रमुख सुरज आवटे, अॅड धनंजय धरणे, विजय डुकरे, अभिजित लाटे, सुजय बिस्वास, योगेश अवचार, अभिषेक आवटे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध