Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९
सातवा वेतन आयोगाचा फरक बाबत गटशिक्षणधिकारी यांना निवेदन
शिंदखेड़ा (प्रतिनिधी)राहूल पाटील महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन शाखा शिंदखेड़याच्या वतीने गटशिक्षणधिकारी एफ के गायकवाड़ यांना निवेदन देण्यात आले या वेळी शिक्षणविस्तार अधिकारी अशोक पवार,शिक्षक नेते गिरीष बागुल उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे की,
सातव्या वेतन आयोगाचा फरक डी सी पी एस धारक यांना रोखीने मिळावा असा शासन निर्णय असतांना अजुन तो मिळालेला नाही तरी तो तात्काळ मिळावा.तसेच सन 2009 ते 2014 पर्यंत डी सी पी एस कपात झालेली आहे त्याचा कोणताही हिशोब डी सी पी एस धारक शिक्षकांना मिळालेला नाही सदर हिशोब मिळावा व त्याच्या पावत्या प्रत्येकाला मिळाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले.
त्यावर गटशिक्षणाधिकार्यांनी सांगितले की तुमच्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेवु व फरक बिल सादर करु आणि झालेल्या कपातीचा हिशोब देवु असे आश्वासन दिले निवेदन देण्यासाठी जूनी पेंशन हक्क संघटनेचे संघटनेचे तालुका अध्यक्ष रंजीत राठोड सरचिटणीस सतीष भुजबळे, जिल्हा कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बाविस्कर तसेच बाळासाहेब बोबडे ,गणेश फड,गौतम पानपाटील,दिपक जाधव,गणेश नागरगोजे,सचिन शिंदे,हेमंत शेवाळे, सुरज गिरासे, नरेंद्र पाटील, कुणाल कापुरे उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा