Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९
शिरपूर संयुक्त क्षत्रिय भावसार युवा मंडळाच्या बक्षीस समारंभ संपन्न
शिरपूर :(प्रतिनिधी) - दिनांक 25/8 /2019 रविवार रोजी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात शिरपूर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले त्याचे समाज बांधवांनी समाजातील माता बंधू भगिनींच्या आशीर्वादाने युवा मंडळ समाजाच्या प्रत्येक कार्यात अग्रेसर असणारा व समाजाच्या भंडारा उत्सव तसेच बक्षीस वितरण सोहळा व जन्मोत्सव नवरात्र अशा कार्यक्रमाला युवा मंडळाचे धोरण असणार आहे त्याचे युवा मंडळ मंडळाचे संघटक व उपाध्यक्ष गणेश भाऊ सर्व शिरपूर शहराचे युवा मंडळ अध्यक्ष कुणाल करोडे यांनी संयुक्तरीत्या वयाने कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.
बक्षीस वितरणाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून समाजाची जेष्ठ पंचसूत्री देविदास रामदास भावसार, सरकारी वकील अवधूत भावसार , उपाध्यक्ष विष्णू गोकुळ भावसार ,सचिव भिकुलाल चुनीलाल भावसार, महिला मंडळ अध्यक्ष वंदना अश्विन भावसार हिंगलाज माता भावसार समाजाचे कोषाध्यक्ष घनःश्याम मोहनलाल भावसार तसेच मिलिंद पंढरीनाथ भावसार यांना युवा मंडळातर्फे प्रमुख मंचावर स्थान देण्यात आले. संयुक्त भावसार युवा मंडळातर्फे बक्षीस वितरण सोहळ्यात इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना युवा मंडळ व शिरपूर भावसार समाज यांच्यावतीने गौरविण्यात आले.
युवा मंडळाचे अध्यक्ष कुणाल नीलचंद्र करोडे , खान्देश संघटक व उपाध्यक्ष गणेश राजेंद्र भावसार, सचिव लोकेश सुरेश भावसार, महासचिव हरीश रत्नाकर भावसार, संघटक कुणाल कृष्णदास भावसार, कोषाध्यक्ष राकेश पंडीत भावसार, संपर्कप्रमुख रवींद्र युवराज भावसार, सदस्य नंदकिशोर लालचंद भावसार, अक्षय मनोहर भावसार, विक्रांत मधुकर भावसार, मोहित सुनील भावसार, सुमित चंद्रकांत भावसार, ओम योगेश भावसार, निलेश भिकुलाल भावसार, यश लक्ष्मीकांत भावसार , दिनेश विजय करोडे, योगेश भावसार, किरण भावसार, अक्षय भावसार ,गोपाल भावसार ,राहुल घनःश्याम भावसार , गौरव गजानन भावसार, विपुल भावसार, योगेश भावसार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. समाजातील माता, बंधू-भगिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुरेश गुरुदास भावसार, आभार रवींद्र भावसार यांनी मानले. समाजाची एकजूट व सशक्तीकरनाचे कार्य गणेश भावसार व युवा मंडळाचे सुरू आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा