Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गावठी पिस्तोल व जिवंत काडतूस हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे गावठी पिस्तोल व जिवंत काडतूस हस्तगत
चोपडा प्रतिनिधी( विनोद निकम )चोपडा शहरातील एस टी बस स्टॅन्ड वर दोन इसम अंदाजे २० ते २५ वयोगटातील बलवाडी ते चोपडा बस मध्ये येणार असुन त्यांचे कडे गावठी पिस्तोल व जिवंत काडतूस आहेत बाबत गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोहेकॉ . नारायण पाटील , रामचंद्र बोरसे , मनोज दुसाने , प्रविण हिवराळे यांना मिळाली होती .
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री . बापू रोहम यांनी पोलीस अधीक्षक डॉ . श्री . पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती . भाग्यश्री नवटके , अपर पोलीस अधीक्षक श्री . सचिन गोरे , सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री . सौरभ अग्रवाल यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व चोपडा शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री . व्ही . पि . लोकरे , पोहेकॉ . जितेंद्र सोनावणे , सुनील पाटिल , ज्ञानेश्वर जवागे , प्रदीप राजपूत ,
प्रकाश मथुरे , योगेश शिंदे , प्रमोद पवार , शुभम पाटिल ,शेषराव तोरे ,निलेश लोहार , योगेश पालवे अशांनी चोपडा एस टी बस स्टॅन्ड वर सापळा लावला होता . बलवाडी ते चोपडा बस चोपडा स्टॅन्ड वर आली असता , बस मधुन प्रवाशी उतरत असतानां बातमी प्रमाने दोन्ही वर्णनाचे इसम मिळून आले . त्यांचे कडील बॅग मध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल ( कट्टा ) व ०५ जिवंत काडतुसे मिळून आले . आरोपी १) तुषार पिताजी चव्हाण वय -२३,रा . भोसे तालुका - कर्जत .जिल्हा - अहमदनगर , हल्ली मुक्कामी - भेकराई नगर , फुरसुंगी , हडपसर पुणें , २) संतोष अशोक माळी वय - २१ , रा . बालाजी नगर ,हडपसर , पुणे याचे कब्जात अनधिकृत एक गावठी पिस्तोल व ०५ जिवंत काडतूस मिळून आल्याने ते ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशन भाग -६ गु र न . ८३/२०१९ भारतीय हत्यार कायदा - ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा