Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

वृंदावन प्रतिष्ठानतर्फे हरेश्र्वर मंदिर परिसरात स्वच्छता







चोपडा प्रतिनिधी विनोद निकम  श्रावण सोमवारी जमणारा भक्तांचा मेळा...त्यानिमित्त झालेले भक्तिमय वातारण...मंदिर परिसरात भरणारी जत्रा...होणारी मोठी उलाढाल...आणि गर्दी ओसरली की त्याठिकाणी होणारी अस्वच्छता....हे साधारणत: सर्वत्र दिसणारे चित्र आहे. पण हीच गर्दी ओसरली की त्याठिकाणी स्वयं प्रेरणेने काही हात ही अस्वच्छता दूर करण्यासाठी राबू लागतात आणि काही काळानंतर एक सुंदर चित्र दिसू लागतं...असा काहीसा अनुभव चोपडेकरांना आज आला.

येथील जुन्या शिरपूर रोडवरील श्री हरेश्र्वर मंदिरात दर श्रावण सोमवारी शिवभक्तांची अन् नागरिकांची मोठी गर्दी होत असते. तिथे भरणारी जत्रा चोपडेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. सोमवारी रात्री उशिरपर्यंत याठिकाणी वर्दळ असते. त्यानंतर मात्र मंदिर परिसरात सर्वत्र केवळ कचरा आणि अस्वच्छता आढळून येते. यावर उपाय म्हणून येथील वृंदावन प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी पहाटे स्वच्छता मोहीम राबिण्यात आली. सकाळी योगासने करण्यासाठी जमलेले प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांनी यांनी मिळून या परिसरात साफसफाई केली व तब्बल १० टन कचरा जमा करून नगर परिषदेच्या ट्रॅक्टरमध्ये भरला. काही काळात हा परिसर लख्ख दिसू लागला. वृंदावन प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे चोपडा शहरातील नागरिकांना सुखद अनुभव आला.

वृंदावन प्रतिष्ठानच्या या स्वच्छता मोहीमेत अध्यक्ष नरेंद्र विसपुते, देना बँकेचे कॅशिअर जितेंद्र दीक्षित, बिना दीक्षित, सविता विसपुते, अजय बारी, दिनेश साळुंके, महेंद्र जैन, दीपक पाटील, दीपक बागुल यांच्यासह सहकारी सहभागी झाले होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध