Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

विद्यार्थ्यांसाठी आदर्श शिक्षक बना- गटशिक्षणाधिकारी पवार




कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
शिक्षक हा ज्ञानदानाचे महान कार्य करत असतो. आपल्या समोरील बालकांसाठी तोच आदर्श असतो तो जे शिकवणार त्यानुसार विद्यार्थी घडणार त्यामुळे आपण प्रामाणिकपणे, निष्ठेने प्रयत्नपूर्वक काम केल्यास विद्यार्थ्यांसाठी आपण नक्कीच आदर्श शिक्षक राहणार असा विश्वास तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी शांताराम पवार यांनी व्यक्त केला. 
 
शिरपूर बीट नं. 2 अंतर्गत सावळदे व जातोडे केंद्रातील शिक्षकांची  महात्मा फुले व आंबेडकर स्मृती विद्यालय जातोडे येथे आयोजित शिक्षण परिषद प्रसंगी ते बोलत होते. पुढे त्यांनी प्रशासकीय बाबी, शालेय रेकाँर्ड, विद्यार्थी गुणवत्ता, विविध लाभाच्या योजना यावर मार्गदर्शन केले. 

डायटचे अधिव्याख्याते सोळूंके यांनी भाषाविकास कौशल्य, अध्ययन निष्पत्ती, शाळा व्यवस्थापन समिती आदी विषयांवर चर्चा केली. डायटचे विषय शिक्षक सतिष जोशी यांनी ईएआरसी कृती बाबत गटागटाने प्रात्यक्षिक करून घेतले.  सावळदे केंद्रातील टँग प्रमुख मनिषा जगताप शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी रिलँक्स अँक्टीव्हीटी सादर केल्या, साधन व्यक्ती मनोहर वाघ यांनी शालेय पोषण आहार योजना, नोंदी, पौष्टिक आहार बाबत चर्चा केली.  विशेष शिक्षक मराठे यांनी सीडब्ल्यूएसएन विद्यार्थ्यांबाबत माहीती सांगीतली.

सावळदे केंद्रप्रमुख एम बी देवरे व जातोडे केंद्रप्रमुख नारायण जमादार यांनी शाळा ऑनलाईन माहीती भरणे,स्वच्छता पंधरवाडा,गणवेश विनियोग,शालेय उपक्रमांचे पीपीटी तयार करणे,आदींवर मार्गदर्शन केले.

 यावेळी सावळदे व जातोडे केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

1 टिप्पणी:

प्रसिद्ध