Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

बसमध्ये चढतांना महिलेची सोनसाखळी लंपास : ६५ हजाराची सोन्याची पोत : चोपडा बसस्थानकावरील घटना



चोपडा(प्रतिनिधी)दीलीप पाटील बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील पासष्ट हजार रुपये किंमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज
दुपारी चोपडा बसस्थानकावर घडली.नेहमी घडणाऱ्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून,खडबळ उडाली आहे.
      
आज दि.२६ रोजी दुपारी २:३० वाजता चोपडा बस स्थानकावर चोपडा-जळगाव बस क्रमांक ०४०७ मध्ये चढत असतांना विजया प्रल्हाद सुर्वे (वय-६८)रा.शिवराम नगर जळगाव या महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतची अडीच तोळा वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास करून पोबारा केला. गळ्यात असलेली सोन्याची पोत कुणीतरी काढल्याचे महिलेच्या लक्षात येताच महिलेने बसस्थानकावर आरडाओरडा केला.प्रवाशांना घडलेला प्रकार सांगितला मात्र तो पर्यंत अज्ञात चोरटा फरार झाला होता.

 याबाबत विजया प्रल्हाद सुर्वे (वय-६८) रा. शिवराम नगर जळगाव या महिलेच्या फिर्यादी वरून शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. ज्ञानेश्वर जवागे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध