Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

सुरेश जैन, देवकरांसह सर्व आरोपी ४८ जण दोषी


जिल्हा न्यायालय सर्व दोषींना करणार शिक्षा जाहीर

माजी मंत्री सुरेश जैन,                                               गुलाबराव देवकर

जळगाव /धुळे :प्रतिनिधी जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत आज निकाल लागला आहे. सुरुवातीला ५७ संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून ४९ संशयितांबाबत हा निकाल येणार आहे. सुनावणी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते तो निकाल आज जाहीर झाला आहे.


हेही वाचाः जळगाव घरकुल घोटाळ्याचा आज निकाल

जिल्हा न्यायालय सर्व दोषींना करणार शिक्षा जाहीर

दरम्यान, बहुचर्चित ४५ कोटींच्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने शनिवारी दोषी ठरवले. हा निकाल देताना न्यायालयाने सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. दुपारनंतर जिल्हा न्यायालय या सर्वांना शिक्षा जाहीर करणार आहे. तसेच सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे पोलिसांना आदेश धुळे जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ यांनी दिले आहे.

या खटल्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ५२ आरोपी आहेत. यातील तीन आरोपी मृत झाले असून एक आरोपी फरार आहे. न्या. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले त्यावेळी या खटल्यातील सर्व ४८ संशयित आरोपी हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध