Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

कठाेऱ्याचा ‘ढाण्यावाघ’ तापीकाठावर विसावला!




चाेपडा तालुक्यातील कठाेरा हे अामचं कष्टकऱ्यांचं लहानसं गाव. जाधव घराण्याचा गावकीचं राजकारण अाणि समाजकारणावर प्रचंड पगडा. शब्द दिल्यानंतर ‘माेडेन पण वाकणार नाही’ अशी या घराण्याची ठसठसीत अाेळख, असं म्हटलं तर ती अतिशयाेक्ती ठरणार 

नाही. डिगंबर बाबुराव जाधव उपाख्य बापू हे याच घराण्यात वाढलेलं नि:स्वार्थी, निगर्वी व्यक्तीमत्त्व. वर्षभरापासून त्यांना दूर्धर व्याधीने ग्रासलं हाेतं. पुणे, मुंबई, नाशिक असे नानाविध ठिकाणी वैद्यकीय उपचार घेऊनही ते या व्याधीवर मात करू शकले नाहीत. रविवारी (दि.४ अाॅगस्ट) सकाळी ६ वाजता वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी इहलाेकीचा निराेप घेतला. ही बातमी कळल्यानंतर मी तर क्षणभर नि:शब्द झालाे. कारण त्यांच्याशी अामच्या 

कुटुंबीयांचा स्नेह दशकानुदशकापासून जुळलेला अाहे. धिप्पाड देहयष्ठी, डाेळ्यात रागीटपणा पण ताेंडात साखर अाणि डाेक्यावर बर्फ असलेला माणूस अशी त्यांची स्वभाववैशिष्ट्ये म्हणावे लागतील. गावात कुणाच्याही भानगडीत ते पडायचे नाहीत. मात्र, एखाद्याचं भांडण सुरू असेल अाणि ते तेथून रस्त्याने जात असतील तर त्यांना पाहिल्यानंतर भांडणाचा अावाज शांत व्हायचा. त्याचं कारण म्हणजे 

लाेकाच्या अंतर्मनाशी त्यांची नाळ जुळली हाेती. म्हणूनच त्यांचा अादरयुक्त दबदबा  हाेता. त्यांचे वडील स्वर्गवासी बाबुराव दाेधू पाटील हे अामचा जन्मही झाला नव्हता तेव्हा पंचायत समितीचे सदस्य हाेते. मात्र, असे असले तरी स्वत: डिगंबर बापू यांना राजकारणाशी फार काही लगाव नव्हता. भाऊबंदकीतली माणसं माेठी व्हावी 

(विशेषत: तरुण) असा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. म्हणूनच तर अलिकडच्या काळात त्यांच्यामुळे अनेक तरुणांना गावकीच्या राजकारणात ‘मानाचं पानं’ मिळालं हे कदापि विसरता येणार नाही.  सहकारी दूध संस्था, विकासाे, 

ग्रामपंचायतीच्या निवडणुका वैरभावना विसरून बिनविराेध व्हाव्या, यासाठी त्यांनी गेल्या दीड ते दाेन दशकात समविचारी नेत्यांसाेबत खांद्याला खांदा लावून काम केले. चाेपडा तालुक्यातील असं एकही गाव नसेल की जेथे त्यांना अाेळखणारी माणसं नसतील. त्याचं कारण म्हणजे घरी येणाऱ्या व्यक्तीला चहापाणी करून अास्थेवाईकपणे विचारपूस करणे ही त्यांची खासियत हाेती. 

माझ्या अन‌् त्यांच्या वयात २० ते २५ वर्षाचं अंतर. मात्र, अामचा दाेघांतील संवाद कुटुंबातील घटकासारखाच असायचा. अामच्या कुटुंबातील सुख-दु:खाच्या प्रसंगी ते अावाज दिला म्हणजे हाकेला अाे द्यायचे. दीड वर्षापूर्वी जळगावात माझा तीन वर्षाचा मुलगा समर्थ (अभंग) याच्यावर अवघड शस्त्रक्रिया झाली. त्याला भेटण्यासाठी डिगंबर बापू हे माझ्या 

वडीलांना घेऊन माेटारसायकलीने अाले हाेते. रुग्णालयात अाल्यावर ते म्हणाले हाेते की, ‘पैशांची चिंता करू नकाे, काहीही मदत लागली तर अावाज दे. अर्ध्या रात्री हजर हाेऊ’, त्यांनी हे जे बळ दिले हाेते ते मला लढण्याची ताकद देऊन गेले. मात्र, अाज जेव्हा त्यांच्या अकाली निधनाची वार्ता माेबालइवर येऊन धडकली तेव्हा अामच्या कुटुंबात सन्नाटा पसरला. कारण एक जीवाभावाचा साेबती, गावकीचा 

हरहुन्नरी माणूस अापल्याला साेडून गेला. अार्थिक स्थैर्य असलेला माणूस जमिनीवर राहून कसा वागताे? याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचे. साधारणत: ३० वर्षांपूर्वी अामची परिस्थिती अतिशय बेताची हाेती. 

कुटुंबातील सर्वच जण मजुरी करायचे. एक रुपयाचे १०० ग्रॅम म्हशीचं दूध यायचे. पाच ते सहा जणांच्या कुटुंबाचा दाेन वेळेचा चहा एवढ्याशा दूधाने व्हायचा. डिगंबर बापू हे जेवण झालं की दरराेज अामच्या घरी अाेट्यावर गप्पा मारायला यायचे. रात्री बऱ्याचदा अामच्याकडे तिसरा चहा व्हायचा. पण १०० ग्रॅम दूध दाेन वेळेच्या चहात संपलेले असायचे. म्हणून बिनादूधाचा काेरा (काळा) चहा अामच्याकडे बनवला जायचा. ताे चहासुद्धा बापू अगदी अानंदाने घ्यायचे. सांगण्याचं तात्पर्य एकचं की माेठा बागायतदार शेतकरी असतानाही त्यांना संपत्तीचा तसूभरही गर्व नव्हता. 

राजकारणात ते फारसे सक्रीय नव्हते. पण राजकारण्यांशी त्यांची घट्ट मैत्री हाेती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लाेकसभा निवडणुकीतले उमेदवार व पदाधिकारी ते कुठल्याही पक्षाचे का असेना त्यांची भेट हमखास घ्यायचे. विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी अामदार डाॅ. सुरेश जी. पाटील, माजी अामदार कैलास पाटील, माजी अामदार प्रा. दिलीपराव साेनवणे, जिल्हा बंॅकेचे माजी चेअरमन अॅड. रवींद्र पाटील अशा अनेक राजकारण्यांशी त्यांचा थेट संपर्क हाेता. अलिकडच्या काळात जिल्ह्याच्या राजकारणाची माहिती ते काही ना काही निमित्त करून माझ्याकडून जाणून घ्यायचे हा त्यांच्या मनाचा माेठेपणा म्हणता येईल. गावात कुठल्याही घटना, दुर्घटनेत मदतीसाठी धावून जाणारा अाणि अादरयुक्त दबदबा असलेला तापीकाठावरचा हा ‘ढाण्यावाघ’ विसावल्याने मन सुन्न झालं अाहे. कठाेरा दूध उत्पादक सहकारी संस्था, पीक संरक्षण संस्था, विकास साेसायटी अशा विविध संस्थांची पदे त्यांनी भूषवली अाहेत. त्यांचा मुलगा मनाेज जाधव याला 

वडीलांच्या दु:खातून सावरण्याचं बळ चराचरात अधिवास करणारा भगवंत देवाे, अशी प्रार्थना. परमेश्वर लाेकसंचयाचा वारसा मागे ठेवून गेलेले डिगंबर बापू यांच्या अात्म्याला चिरशांती देवाे, अशी मनाेकामना करून दु:खाश्रू गिरवणारी लेखणी थांबवताे. 

- अानंदा लाेटन पाटील, जळगाव
माेबाइल नंबर : ९९२३७६९३०५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध