Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९
शिरपूर:- संवाद यात्रेदरम्यान रेशनकार्ड बाबत उदभवणार्या समस्या समोर आल्याने
शिरपूर (प्रतिनिधी)जिल्हा नियोजन बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित केल्याने दि ७ ते दि १४ पर्यंत शिरपूर तहसील कार्यालय मार्फत तालुक्यातील प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी कँमचे आयोजन करण्यात आले आहे.यात मोफत १०० टक्के गँस जोडण्यात येणार आहे.
भाजपाचे तालुका प्रभारी डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या नियोजनाखाली संपूर्ण तालुक्यात संवाद यात्रा दरम्यान जनतेच्या समस्या व प्रश्न समजुन घेण्यात आल्या आहेत.यात बहुतांश नागरिकांनी रेशनकार्डाबाबत तक्रारी डॉ ठाकूर यांच्या समोर मांडल्या. यावर डॉ जितेंद्र ठाकूर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तालुक्यातील रेशनकार्डमुळे होणाऱ्या गैरसोय बाबत प्रश्न उपस्थित केला होता.यानुसार पंडित दिनदयाल योजनेमार्फत नवीन रेशनकार्ड, फाटक्या रेशनकार्ड बदलुण
मिळणे,अंत्योदय मध्ये नव्याने नाव नोंदणे यासह रेशनकार्डाचे विविध समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी शिरपूर तहसील कार्यालय यांच्या मार्फत दि.७ आँगस्ट ते १४ आँगस्ट पर्यंत प्रत्येक मंडळाच्या गावात कँमचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळात येणाऱ्या गावांतील गरजुंनी ठरवलेल्या तारखेला त्या दिवशी तेथील मंडळाच्या गावात उपस्थित रहावे.
यात नविन रेशनकार्ड करीता विहीत नमुन्यातील आँनलाईन आँफलाईन फाँर्म,अर्जदाराचे नावाने १०० वर प्रतिञापत्र,घराची वीजबिलाची छायांकित प्रत,रहिवासी पुरावा किंवा नगरसेवक,तलाठी दाखला,स्वताच्या घराचा उतारा व करपावती,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला,आधारकार्ड छायांकित प्रती,निवडणूक ओळखपत्रांची छायांकित प्रत,अर्जदार भाड्याच्या घरात राहत असेल तर घरमालकाचे संमतीपत्र,राष्ट्रीयक्रुत बँकेचे संयुक्त खाते पासबुकाची छायांकित प्रत,गँस एजन्सीचा दाखला,तलाठी किंवा मंडळ अधिकारी चौकशी अहवाल आदी कागपत्रसह उपस्थित राहण्याचे अहवान डॉ जितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावांनी तारखेनुसार त्या मंडळच्या गावात उपस्थित रहावे.
दि ७ रोजी बुधवारी शिरपूर मंडळांंतर्गत व थाळनेर मंडाळांंतर्गत कँम घेण्यात येणार आहे.
दि ८ रोजी गुरुवारी होळनांथे मंडळांतर्गत व अर्थे मंडळांतर्गत कँम घेण्यात येणार आहे.
दि ९ रोजी शुक्रवारी जवखेडा मंडळार्तंगत कँप घेण्यात येईल
दि १३ रोजी मंगळवारी बोराडी मंडळांंतर्गत कँप घेण्यात येईल
दि १४ रोजी बुधवारी सांगवी मंडळांतर्गत कँप घेण्यात येणार आहे.
दिलेल्या तारखेला उपस्थित राहुन रेशन कार्ड व गँस बाबत आपल्या समस्या निराकरण करून घ्यावे.याबाबत कागदपत्रांची समस्या व पुर्तता करण्यासाठी संबंधित तलाठी व मंडळाधिकारींंशी संपर्क साधावा असे आव्हान तहसीलदार, पुरवठा अधिकारी व डॉ जितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा