Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९
संकट काळात साथ देणाऱ्या मित्राला मदत करा
सांगली व कोल्हापूरकरांना मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे लातूरकरांना आवाहन
प्रतिनिधी( गजानन अनंतवाळ)लातूर, दि. 9 : सन 2016 मध्ये शहरात जलसंकट निर्माण झाले होते. त्या वेळी सरकारने शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. सांगलीकरांनी आढेवेढे न घेता लातूरकरांना कृष्णा नदीचे पाणी उपलब्ध करून दिले होते. संकटाच्या काळात एक मित्र म्हणून सांगलीकरांनी केलेली ही मदत लातूरकरांसाठी मोठीच होती. संकटात साथ देणारे सांगलीकर महापूरांमुळे अडचणीत असून आता त्यांना साथ देण्यासाठी लातूरकरांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
आपापल्या परीने जी शक्य होईल ती मदत सर्वांनी द्यावी. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वस्तू, कपडे, औषधी आदी मदत देऊ
इच्छिणाऱ्यांनी डॉ. गव्हाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीकांत यांनी केले आहे. 2016 मध्ये लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासाठी मिरज (जि. सांगली) येथून स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली होती. रेल्वेची कृष्णा नदीवरून पाणी योजना आहे. नदीतून पाणी उपसा करून ते साडेचार किलोमीटर अंतरावरील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. या केंद्रापासून दोन हजार सातशे मीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकून व
रेल्वेस्थानकाजवळील एका विहिरीचा आधार घेऊन सांगलीकरांनी अवघ्या दहा दिवसात पाणी देण्याची व्यवस्था केली होती. जिल्हा प्रशासनाला तेथील नागरिक व पदाधिकाऱ्यांनी साह्य केले होते. संकटाच्या काळात सांगलीकरांनी कोणतीही सबब पुढे न करता लातूरकरांना मदत केली होती. ही मदत त्या काळात लातूरकरांसाठी लाख मोलाची ठरली. रेल्वेने आलेल्या पाण्यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला. आता महापूरांमुळे संकटात सापडलेल्या
सांगलीकरांना मदत करण्याची वेळ आली आहे. यामुळे लातूरकरांनी संकटात साथ देणाऱ्या लातूरकरांना आपापल्या परिने जी शक्य होईल ती मदत करावी, असे श्रीकांत यांनी केले आहे. नेहमीच दुसऱ्याच्या मदतीला धाऊन जाणारे लातूरकर आता सांगली व कोल्हापूरकरांच्या मदतीसाठीही पुढाकार घेतील, अशी आशा श्रीकांत यांनी व्यक्त केली.
अशी करता येईल मदत
पुरामुळे अडचणीत सापडलेल्या सांगलीकरांना मदतीची आशा आहे. कोणत्याही बॅंकेतून मुख्यमंत्री निधीच्या खात्यात रक्कम भरून रोख स्वरूपात मदत करता येईल. कपडे, औषधी व अन्य जीवनाश्यक वस्तूंची मदत जिल्हाधिकारी कार्यालयात आणून देता येईल. मदतीचे स्वरूप व ती देण्यासाठी नागरिक तसेच सर्व घटकांतील दानशूरांनी निवासी
उपजिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांच्याशी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (02382) 224001 9421373076 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा